बंद लाईट असलेल्‍या रिक्षाची धडक; पोलिस कर्मचाऱ्याचा मृत्‍यू, पत्‍नी– मुलगी जखमी

बंद लाईट असलेल्‍या रिक्षाची धडक; पोलिस कर्मचाऱ्याचा मृत्‍यू, पत्‍नी– मुलगी जखमी
Accident
AccidentSaam tv
Published On

नवापूर (नंदुरबार) : धुळे– सुरत राष्ट्रीय महामार्गावर नवापूरनजीक रायंगण गावाजवळ रात्री ॲपेरिक्षा व मोटरसायकलचा अपघात (Accident) झाला. यात मोटारसायकलस्वार पोलिस दिनकर पाडवी यांच्या डोक्याला जबर दुखापत झाल्याने जागीच मृत्यू झाला. तर पत्नी व दीड वर्षांचा मुलगा जखमी आहेत. त्‍यांच्‍यावर व्यारा येथे खाजगी रुग्णालयात (Hospital) उपचार घेत आहेत. (nandurbar news Hit of a rickshaw with off lights Death of a police officer in accident)

Accident
काम आटोपून घरी जाताना काळाची झडप; दुचाकीवरील दोन्ही ठार

वावडी (ता. नवापूर) येथील रहिवासी दिनकर पाडवी हे सिंधुदुर्ग (Sindhudurg) येथे पोलीस दलात सेवेत होते. दिनकर पाडवी हे पत्नी व मुलासह सासरवाडी तीनटेम्बा (ता. नवापूर) येथून आपल्या गावाला वावडी (ता. नवापूर) परत मोटारसायकलने (क्र. जीजे २६, जे ७८८१) जात होते. या दरम्‍यान रायंगणजवळ लाईट बंद असलेल्या ॲपेरिक्षाने (क्र. जीजे २६, यु १४५१) जबर धडक दिली. यात पोलीस (police) कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू झाला.

अपघात होताच स्थानिक लोकांनी जीवनधारा रुग्णवाहिकेच्या विनेश गावित यांना अपघाताची माहिती दिली. विनेश गावीत व एलेक्स गावीत हे अवघ्या दहा मिनिटात घटनास्थळी दाखल झाले. यानंतर अॅम्बुलन्‍सने जखमींना उपचारांसाठी नवापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलीस दिनकर पाडवी यांचा मुत्य झाला. तर त्यांची पत्नी ज्योती पाडवी हे व्यारा येथे उपचार घेत आहेत. त्यांना दिड वर्षाचा मुलगा जयेश पाडवी आहे. याबाबत नवापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com