Shahada Police : गुटख्याची गुजरातमधून वाहतूक; शहादा पोलिसांकडून २४ लाखाचा गुटखा जप्त

Nandurbar News : नंदुरबार जिल्हा गुजरात राज्याच्या सीमेलगत असल्याने गुजरातमधून महाराष्ट्र बंदी असलेला गुटखा महाराष्ट्रात आणला जातो. शिवाय मध्यप्रदेशमधून देखील गुटखा आणला जात असल्याचे अनेकदा समोर आले
Shahada Police
Shahada PoliceSaam tv
Published On

सागर निकवाडे 
नंदुरबार
: गुटखा विक्री व वाहतुकीस बंदी घालण्यात आली आहे. तरी देखील गुटखा, पान मसाल्याची छुप्या पद्धतीने वाहतूक केली जात असल्याचे अनेकदा समोर आले आहे. पोलिसांकडून कारवाई करत हा गुटखा जप्त देखील करण्यात आला आहे. अशाच प्रकारे बंदी असलेला गुटखा व पानमसाला वाहतूक केली जात असताना शहादा पोलिसांनी कारवाई केली आहे. या कारवाईत २४ लाखाचा गुटखा जप्त करण्यात आला आहे. 

नंदुरबार जिल्हा गुजरात राज्याच्या सीमेलगत असल्याने गुजरात मधून मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्र बंदी असलेल्या गुटखा महाराष्ट्रात आणला जात असतो. या शिवाय मध्य प्रदेशमधून देखील हा गुटखा आणला जात असल्याचे अनेकदा समोर आले आहे. बंदी असताना देखील इतक्या मोठ्या प्रमाणात गुटख्याची वाहतूक कशी काय केली जाते? असा प्रश्न निर्माण होत आहे. अशाच प्रकारे शहादा पोलिसांनी केलेल्या कारवाईतून समोर आले आहे. 

Shahada Police
Nandurbar Crime : ताप्ती गंगा एक्सप्रेस मधल्या हल्ल्यातील एका जखमीचा मृत्यू; नातेवाईक आक्रमक

अन्न औषध प्रशासन आणि शहादा पोलिसांची संयुक्तरीत्या कार्यवाही केली आहे. दरम्यान गुजरात राज्यातून मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्र बंदी असलेल्या गुटखा पान मसाला महाराष्ट्रात येत असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे सापळा रचत कारवाई करण्यात आली आहे. मात्र संबंधित विभागाकडून या गुटखा तस्करी करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येत नाही. मात्र पोलिसांकडून करण्यात आलेल्या या कारवाईमुळे गुटखा तस्करी करणाऱ्यांना चांगलीच चपराक बसली आहे.

Shahada Police
Ambernath Crime : अंबरनाथ हादरलं! दिवसाढवळ्या महिलेची हत्या; रेल्वेकडे जाणाऱ्या ब्रिजवर नेमकं काय घडलं?

२४ लाखांचा गुटखा जप्त 

शहादा पोलिसांना मिळालेलय माहितीवरून  शहादा पोलिसांनी सापळा रचत २४ लाख ३४ हजार रुपयांचा गुटखा व पान मसाला जप्त केला आहे. यात साधारण १ हजार ६२० पाकिटे गुटखासह ट्रक देखील जप्त करण्यात आली आहे. तसेच ट्रक चालका विरोधात अन्न सुरक्षा कायदा अंतर्गत शहादा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे गुटखा तस्करांचे धाबे दणाणले आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com