घरकुल आवास योजनेपासुन वंचित; लाभार्थ्यांचा भर उन्‍हात जिल्हा परिषदेवर मोर्चा

घरकुल आवास योजनेपासुन वंचित; लाभार्थ्यांचा भर उन्‍हात जिल्हा परिषदेवर मोर्चा
Nandurbar zp
Nandurbar zpSaam tv
Published On

नंदुरबार : धडगाव तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत राजबर्डीमधील 1840 लाभार्थ्यांना पंतप्रधान आवास योजनेपासून जाणून-बुजून वंचित ठेवले. असा आरोप करत ग्रामस्थांनी आज थेट भर उन्हात जिल्हा परिषदेवर (Zilha Parishad) मोर्चा काढला. (nandurbar news Deprived of Gharkul Awas Yojana Morcha on Zilla Parishad)

Nandurbar zp
कर्मचाऱ्यांच्या गलथान कारभाराचा मनस्‍ताप मालमत्ता कर भरणाऱ्या नागरिकांना

ग्रामसेवक, सरपंच व सदस्य आणि रोजगार सेवक यांनी आपल्या स्वार्थासाठी जवळच्या नागरिकांना डबल लाभ दिला असून ग्रामपंचायतमधील सर्वेनुसार 3 हजार 200 लाभार्थी पात्र असतानाही 1840 लाभार्थ्यांची माहिती अपलोड न केल्याने आवास योजनेचा लाभ न मिळाल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. यासंदर्भात मोर्चेकऱ्यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे यांना निवेदन दिले. अपात्र ठरवलेल्या नागरिकांचे सर्वेक्षण करून लाभ द्यावा अशी मागणी केली. तसेच घरकुल आवास योजनेत घोटाळा करणारे ग्रामसेवक, सरपंच, सदस्य व रोजगार सेवक यांची चौकशी करून त्यांच्यावर (Nandurbar News) कारवाई करावी अशी मागणी देखील केली आहे.

दोनशेहून अधिक नागरीकांचे निदर्शने

राजबर्डी ग्रुप ग्रामपंचायतमधील शेलकुवी येथील 200 पेक्षा अधिक नागरिकांनी भर उन्हामध्ये जिल्हा परिषदेच्या बाहेर निदर्शने करत जोरदार घोषणाबाजी केली. सदर प्रकरणांबाबत प्रशासनाने कारवाई न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा अपात्र लाभार्थ्यांनी दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com