कर्मचाऱ्यांच्या गलथान कारभाराचा मनस्‍ताप मालमत्ता कर भरणाऱ्या नागरिकांना

कर्मचाऱ्यांच्या गलथान कारभाराचा मनस्‍ताप मालमत्ता कर भरणाऱ्या नागरिकांना
Dhule Corporation
Dhule CorporationSaam tv
Published On

धुळे : महापालिकेमध्ये मालमत्ता कर भरण्यासाठी दोन दिवस शिल्लक राहिले असताना नागरिकांनी कर भरण्यासाठी येत आहेत. भर उन्हामध्ये नागरिकांनी थकीत मालमत्ता कर भरण्यासाठी रांगा लावल्या व शास्तीकरमध्ये पालिका प्रशासनातर्फे सूट देण्यात आल्यानंतर थकित कर भरला आहे. अशा परिस्थितीमध्ये बँक (Bank) कर्मचाऱ्यांच्या गलथान कारभारामुळे काही मालमत्ता कर भरणाऱ्या नागरिकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. (dhule news corporation the citizens who pay property tax)

Dhule Corporation
Dhule: उष्णतेचा पारा वाढला अन्‌ लिंबूचा दरही

धुळे महापालिकेचे (Dhule Corporation) महापौर प्रदीप करपे यांनी बँक अधिकाऱ्यांना व संबंधित ज्या नागरिकांच्या मालमत्ता कर भरणामध्ये तफावत आढळून आली आहे; अशा नागरिकांना बोलावून त्यातील त्रुटी समजून घेतल्या. एकदा भरणा झाल्यानंतर त्याबाबतची पावती संबंधित कर भरणाऱ्या नागरिकांना दिल्यानंतर सर्वस्वी जबाबदारी ही संबंधित बँक कर्मचाऱ्याची आहे. यामुळे बँक कर्मचाऱ्याने पावती देण्यापूर्वीच भरणा केलेल्या रक्कमेची संपूर्ण तपासणी करणे आवश्यक असताना असे न झाल्यामुळेच बँक कर्मचाऱ्यांच्या गलथान कारभारामुळेच कर भरणाऱ्या नागरिकांना नाहक वेठीस धरण्यात येऊ नये, असे महापौर करपे यांनी सुचना दिल्‍या. तसेच संबंधित बँक कर्मचार्‍यांची ही जबाबदारी असल्याने संबंधित बँक कर्मचाऱ्याने तफावत आढळून आलेली रक्कम जमा करावी व नागरिकांना नाहक त्रास देऊ नये अशा सूचना दिल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com