Dhule: उष्णतेचा पारा वाढला अन्‌ लिंबूचा दरही

उष्णतेचा पारा वाढला अन्‌ लिंबूचा दरही
Lemon Market
Lemon MarketSaam tv
Published On

धुळे : हवामान विभागातर्फे धुळे जिल्ह्यामध्ये पुढील दोन ते तीन दिवस तापमानाचा पारा आणखीन वाढणार असल्याची शक्यता वर्तविली आहे. सध्या धुळे जिल्ह्यातील तापमानाचा पारा ४१ अंशाच्‍या वर गेल्यामुळे उष्णता अधिक वाढली आहे. त्यामुळे लिंबू सरबत पिणाऱ्यांची संख्या देखील वाढली आहे. आणि त्यामुळेच (Dhule News) निंबुला बाजारपेठेमध्ये चांगल्या पद्धतीने मागणी असल्यामुळे लिंबू उत्पादकांना चांगले दिवस आले आहेत. (dhule news Heat mercury increased and so did the price of lemon)

Lemon Market
लालपरीच्या रोज ५०० फेऱ्या; अडीच हजार कर्मचारी अद्याप गैरहजर

दोन वर्ष सलग कोरोनाचा (Corona) प्रादुर्भाव असल्यामुळे बाजारपेठा बंद होत्या. त्यामुळे शेतामध्ये पिकलेला लिंबू हा शेतातच खराब होत होता. परंतु यंदा बाजारपेठा देखील खुल्या झाल्या आहेत आणि उष्णतेची तीव्रता वाढल्यामुळे बाजारपेठेमध्ये लिंबूला मागणी देखील वाढू लागली आहे. त्यामुळे दोनशे रुपये किलोपर्यंत लिंबूचा दर वधारला असून त्यामुळे लिंबू उत्पादक शेतकऱ्यांना (farmer) समाधानकारक भाव मिळत असल्यामुळे लिंबू उत्पादक शेतकरी सुखावला आहे.

अनेकांनी काढल्‍या बागा

सलग दोन वर्ष पीक चांगले येऊन देखील बाजारपेठा बंद असल्यामुळे लिंबू उत्पादक शेतकऱ्यांना नुकसान सोसावे लागले होते. यंदा देखील अशीच काहीशी परिस्थिती राहिली असती; तर लिंबूची बाग काढून त्या ठिकाणी दुसरे पीक घेण्याचा निर्णय देखील शेतकर्यांतर्फे घेण्यात आला होता. परंतु यंदा चित्र काहीसे वेगळे बघायला मिळाले. बाजारपेठा खुल्या झाल्यात आणि बाजारामध्ये लिंबूला मागणीदेखील वाढल्याने यंदाचे वर्ष लिंबू उत्पादकांसाठी कमाईचे ठरत असल्याचे दिसून येत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com