बिल काढण्यासाठी ४३ लाख लाचेची मागणी; चार लाख घेताना एसीबीच्या जाळ्यात

बिल काढण्यासाठी ४३ लाख लाचेची मागणी; चार लाख घेताना एसीबीच्या जाळ्यात
Bribe
BribeSaam tv
Published On

नंदुरबार : शासकीय ठेकेदाराकडून झालेल्या कामांचे बिल काढण्यासाठी लाचेची मागणी केली. लाच हजारावर नाही तर लाखोत असून तब्बल ४३ लाख ७५ हजाराची लाच मागितली. या रक्‍कमेतील टोकणची रक्‍कम स्‍वीकारताना दोघे रंगेहाथ पकडले गेले. (nandurbar news Demand for Rs 43 lakh bribe for billing)

Bribe
आठवीच्या विद्यार्थ्यांने साकारला ड्रोन ॲम्बुलन्सचा पर्याय

नंदुरबार (Nandurbar) जिल्हा परिषद बांधकाम विभागातंर्गत असलेल्‍या अक्कलकुवा उपअभियंता सुनील पिंगळे व शाखा अभियंता एस. बी. हिरे यांना लाच (Bribe) स्वीकारताना अटक एसीबीच्या पथकाने पकडले आहे. झालेल्‍या कामांची बिले काढण्यासाठी संबंधीत ठेकेदाराकडून लाचेची मागणी केली होती. ठेकेदाराची एकुण 8 कोटी 45 लाख 89 हजार रुपयांच्या बिलाची रक्कम आहे.

पहिल्‍या हप्‍त्‍यात चार लाख

अक्‍कलकुआ (Akkalkuwa) येथील उपअभियंता व शाखा अभियंता यांना ठेकेदाराकडून तब्‍बल ४३ लाख ७५ हजार रूपयांची लाच मागितली होती. या रक्‍कमेतील पहिला हप्ता चार लाख रूपयांची टोकण रक्कम स्वीकारतांना अक्कलकुवा उपविभागीय अभियंत्यासह दोघे एसीबीच्या जाळ्यात अडकले. नंदुरबार एसीबीच्या पथकाची अद्यापपावेतोची सर्वात मोठी कारवाई मानली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com