Nandurbar News
Nandurbar NewsSaam tv

Nandurbar: नदीवर पूल नसल्याने जीवघेणा प्रवास; ग्रामस्थ व शालेय विद्यार्थ्यांचे हाल

नदीवर पूल नसल्याने जीवघेणा प्रवास; ग्रामस्थ व शालेय विद्यार्थ्यांचे हाल
Published on

नंदुरबार : शहादा तालुक्यातील कोटबांधणी ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या भाऊसिंगपाडा, चंद्रसिंगपाडा, गुराडपाडा, सिसापाडा, बामणकुंडपाडा येथील नागरिकांना रेशन, पोषण आहार, तसेच शालेय विद्यार्थ्यांना (Student) शाळेत कोटबांधणी येथे जाण्यासाठी नदीतून जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. पूल नसल्याने विद्यार्थ्यांना पालक आपल्या पाठीवर बसवून नदी पार करत असल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. (Nandurbar News)

Nandurbar News
वीजपुरवठा खंडित होण्याच्या बनावट मेसेजपासून सावधान; महावितरणचे आवाहन

अतिदुर्गम धडगाव तालुक्यातील (Nandurbar) तालुक्यात पाडा शाळेवर येण्यासाठी विद्यार्थ्यांना पुराच्या पाण्यातून वाट काढावी लागत असल्याची बातमी प्रसिद्ध झाली. या बातमीची दखल घेऊन प्रशासन व लोकप्रतिनिधींना जाग येण्याआधीच पोलीस विभागाने स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून लोखंडी पूल उभा करून विद्यार्थ्यांना सोय करून दिली आहे. याबाबत (Nandurbar ZP) जिल्हा परिषद स्थायी समिती सदस्यांनी प्रशासनावर रोष व्यक्त केला होता. पोलीस विभाग काम करू शकते तर प्रशासनातले अधिकारी काय करतात? असा प्रश्न उपस्थित केला होता.

दुर्गम भाग आजही दुर्लक्षित

काही ठिकाणी गरज नसताना पूल बांधले जातात; पण दुर्गम आजही दुर्लक्षित असल्याचा आरोप येथील ग्रामस्थांनी केला आहे. सातपुड्याच्या दऱ्याखोऱ्यांत मुसळधार पाऊस होत असल्याने नद्या-नाल्यांना पूर पर्जन्य परिस्थिती नेहमी पाहायला मिळते. याचा फटका अद्यापही पूल नसलेल्या या पाड्यावरील नागरिकांना बसत आहे. निवडणुका आल्या की मतदान मागण्यासाठी नेतेमंडळी येऊन सुविधा देण्याचे आश्वासन देतात. मात्र नेहमी दुर्लक्ष करत असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com