सागर निकवाडे
नंदुरबार : राज्य सरकारची महत्त्वाकांक्षी मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजना सध्या मोठ्या वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. या योजनेअंतर्गत प्रशिक्षण घेतलेल्या एक लाखांहून अधिक 'लाडक्या भावां'च्या प्रशिक्षणार्थी भवितव्यावर बेरोजगारीची टांगती तलवार लटकली आहे. दरम्यान विविध मागण्यांसाठी हे प्रशिक्षणार्थी आता आक्रमक झाले असून, सामाजिक कार्यकर्ते तुकाराम बाबा महाराज यांच्या नेतृत्वाखाली मुंबईच्या आझाद मैदानावर ५० हजारहून अधिक प्रशिक्षणार्थी छत्री आंदोलनात सहभागी होणार आहेत.
राज्य सरकारने मोठ्या गाजावाजा करत सुरू केलेल्या लाडका भाऊ या योजनेचा उद्देश राज्यातील तरुणांना प्रशिक्षित करून त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचा होता. मात्र, योजनेच्या अंमलबजावणीतील त्रुटी आणि प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतरही नोकरीच्या संधी उपलब्ध न झाल्याने प्रशिक्षणार्थींमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. यामुळेच लाडका भाऊ योजना फेल ठरली अशी भावना आता या प्रशिक्षणार्थींमध्ये निर्माण झाली आहे.
१ लाखाहून अधिक प्रशिक्षणार्थींवर टांगती तलवार
दरम्यान सदर योजनेत राज्यभरातुन एक लाखापेक्षा अधिक तरुणांनी योजनेत सहभागी होत प्रशिक्षण पूर्ण केले आहे. मात्र राज्य सरकारची लाडका भाऊ योजना फेल ठरली असून मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजनेतील प्रशिक्षणार्थीवर आता बेरोजगारीची टांगती तलवार आहे. यात नंदुरबार जिल्ह्यातील 5 हजार 800 प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
आझाद मैदानावर छत्री आंदोलन
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील बेरोजगार तरुणांच्या हक्कासाठी लढणारे सांगलीचे तुकाराम बाबा महाराज यांनी या विरोधात आंदोलन पुकारले आहे. मुंबईच्या आझाद मैदानावर छत्री मोर्चा काढण्यात येणार असून बेरोजगार तरुणांच्या हातांना काम द्या या मागणीसाठी मोर्चाची तयारी आहे. तुकाराम बाबा महाराज यांचा नेतृत्वाने ५० हजाराहून अधिक प्रशिक्षणातील छत्री आंदोलनाला सहभागी होणारा आहेत.
प्रशिक्षणार्थींच्या प्रमुख मागण्या
राज्यभरातील एकूण १ लाख ३ हजारहून अधिक मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचे प्रशिक्षणार्थी मागण्यांसाठी एकवटले आहेत. त्यांच्या प्रमुख मागण्यांमध्ये, प्रशिक्षण पूर्ण झालेल्या सर्व प्रशिक्षणार्थींना तातडीने रोजगार उपलब्ध करून देणे, योजनेतील त्रुटी दूर करून ती अधिक प्रभावीपणे राबवणे, आणि प्रशिक्षणार्थ्यांना देण्यात येणाऱ्या मानधनात वाढ करणे यांचा समावेश आहे. तुकाराम बाबा महाराज यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन: सामाजिक कार्यकर्ते तुकाराम बाबा महाराज यांनी या बेरोजगार तरुणांच्या मागण्यांना पाठिंबा दिला असून, त्यांच्याच नेतृत्वाखाली हे आंदोलन होत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.