Nandurbar News: नाल्यात आढळले २ हजारांच्या नोटांचे बंडल; नकली नोटा पाहण्यासाठी गर्दी

नाल्यात आढळले २ हजारांच्या नोटांचे बंडल; नकली नोटा पाहण्यासाठी गर्दी
Fake Notes Nandurbar
Fake Notes NandurbarSaam tv
Published On: 

सागर निकवाडे

नंदुरबार : नंदूरबार शरातील धुळे चौफुली परिसरात असलेल्या एका नाल्यात २  हजारांच्या चक्क १५ ते २० नकली नोटा (Nandurbar News) आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. नकली नोटा (fake Notes) पाहण्यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात धुळे चौफुली परिसरात मोठी गर्दी केली होती. (Breaking Marathi News)

Fake Notes Nandurbar
Buldhana News: चार दिवसांच्या अवकाळी पावसाने गावाचा संपर्क तुटला; रेल्वे रुळावरून करावा लागतोय जीवघेणा प्रवास

चलनात नकली नोटा वापरल्‍या जात असल्‍याचे अनेकदा समोर आले आहे. अनेक ठिकाणी नकली नोटा छपाईचा कारखाना देखील उध्‍वस्‍त करण्यात आला आहे. अशात नंदुरबार शहरात नाल्‍यात आढळून आलेल्‍या नकली नोटांच्‍या बंडलाने खळबळ उडाली आहे. या नोटा पाहण्यासाठी नागरीकांची गर्दी झाली होती. तर बातमी पोलिसांपर्यंत पोहचल्‍यानंतर पोलिसांनी देखील याचा तपास सुरू केला आहे.

Fake Notes Nandurbar
Nashik Crime News: चाकात लवकर हवा भरून न दिल्याचा राग; मद्यपी तरूणांनी दुकानदारास जीवे मारले

नोटा पोलिसांच्‍या ताब्‍यात

खऱ्या दिसणाऱ्या या २  हजाराच्या नोटा या ठिकाणी टाकल्या कोणी? हे अद्यापही स्पष्ट झालेले नाही. तरी नंदुरबार पोलिसांनी या नोटा ताब्यात घेतले आहेत. नकली नोटा ताब्यात घेतल्या असल्या तरी पोलिसांमार्फत अधिकृत अशी कोणतीही माहिती अद्यापही देण्यात आलेली नाही. नकली नोटा पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली असल्यामुळे काही काळ वाहतुकीस अडथळा निर्माण झाला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com