शंभर वर्षांची परंपरा..श्री महाकाली मातेची यात्रा यंदा भरणार

शंभर वर्षांची परंपरा..श्री महाकाली मातेची यात्रा यंदा भरणार
Nandurbar
Nandurbar saam tv
Published On

नंदुरबार : अक्कलकुवा शहराजवळील सोरापाडा येथील श्री महाकाली माता देवीच्या यात्रेला १०० वर्षाची परंपरा आहे. या १०० वर्षाच्या परंपरेला कोरोना महामारीमुळे खंड पडला होता. मात्र यावर्षी १६ ते १८ फेब्रुवारी २०२२ दरम्‍यान कोरोनाचे (Corona Rules) नियम पाळत यात्रा भरवण्यात येणार असल्याची माहिती विश्वस्त मंडळाने दिली आहे. (nandurbar news akkakuwa taluka Yatra of Shri Mahakali Mata after two year)

Nandurbar
Cyber Crime: पोलिसालाच ऑनलाईन गंडा..लाखो रुपयांची फसवणूक

अक्कलकुवा (Akkalkuwa) तालुक्यातील सोरापाडा येथे नवसाला पावणारी महाकाली मातेची यात्रा माघ शुद्ध पौर्णिमेला भरवण्याची शतकी परंपरा आहे. मात्र कोरोनाच्या (Corona) वैश्विक महामारीमुळे गेल्या दोन वर्षापासून शासनाने यात्रा भरविण्यावर निर्बंध लावले होते. परिणामी दोन वर्षांपासुन अक्कलकुवा तालुक्यातील कोणतीच यात्रा भरली नाही. त्यामुळे बैल व्यापारासाठी प्रसिद्ध असलेल्या यात्रेत कोट्यावधी रुपयांच्या उलाढाली ठप्प झाल्या होत्या. सलग २ वर्षापर्यंत यात्रा न भरल्यामुळे त्याचा थेट फटका शेतकरी (Farmer) व व्यावसायिक यांना बसला होता.

जनतेची होती मागणी

अनेक कुटुंबे ही घरादारासाठी लागणारी साहित्य तसेच शेतकरी वर्ग आपल्या शेती उपयोगी साहित्याची खरेदी हे विशेषतः यात्रेतच करीत असतात त्यामुळे कोट्यवधीच्या वस्तुंची खरेदी विक्री ही यात्रेत होत असते. मात्र यात्रा न भरल्याने शेकडो कुटुंबाच्या उदरनिर्वाहाच्या संसाधनाना तसेच उत्पन्नाला खीळ बसली होती. त्याचाच विचार करुन जनतेची गरज आणि मागणी लक्षात घेऊन यावर्षी श्री महाकाली माता मंदिर विश्वस्त मंडळाच्यावतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन यात्रा भरवण्याविषयी विनंती केली होती. त्यानुसार विश्वस्त मंडळाने निर्गमित केलेल्या नियमावलीनुसार कोरोना नियमांचे पालन करुन यात्रा भरवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com