Ganesh Festvial 2023 : पारंपारिक बँड, वाद्यांवरही बंदी, नंदुरबारच्या सार्वजनिक गणेशाेत्सव मंडळांची जिल्हाधिका-यांकडे धाव

प्रशासनाने सहकार्याची भावना ठेवावी असेही गणेशाेत्सव मंडळांच्या कार्यकर्त्यांनी म्हटले.
nandurbar, ganesh festival 2023
nandurbar, ganesh festival 2023saam tv

- सागर निकवाडे

Nandurbar News : गणेशोत्सव काळात डीजे मुक्त मिरवणुकांना नंदुरबार जिल्ह्यातील मंडळांनी प्रतिसाद दिल्यानंतरही पारंपारिक बँड पथकला पोलीस प्रशासन परवानगी देत नसल्याने गणेश मंडळाचे पदाधिकारी आक्रमक झाले आहेत. तालुक्यातील गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी आणि सदस्यांनी जिल्हा प्रशासनास वाद्यांना परवानगी देण्याची मागणी केली. (Maharashtra News)

nandurbar, ganesh festival 2023
Dhangar Aarakshan Andolan : धनगर आरक्षणासाठी तुळजापूरात महामाेर्चा

नंदुरबार जिल्हा पोलीस दलाच्या वतीने डीजे मुक्त गणेश उत्सवाची घोषणा केली आहे. या घोषणेला ग्रामीण भागातील आणि शहरी भागातील गणेश मंडळांनी प्रतिसाद दिला खरा मात्र पारंपारिक बँड आणि पारंपारिक वाद्यांना परवानगी देताना पोलीस प्रशासनाकडनं मंडळाच्या कार्यकर्त्यांना अडचणी निर्माण केल्या जात आहेत.

nandurbar, ganesh festival 2023
Swabhimani Shetkari Sanghatana : मंत्र्यांवर राेष...; पुणे- नाशिक महामार्ग 'स्वाभिमानी' ने राेखला

त्याच्या निषेधार्थ आज गणेश मंडळाच्या जवळपास ४०० ते ५०० ग्रामीण भागातील ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालयात धाव घेतली. सर्वच गणेशाेत्सव (ganeshostav) मंडळांनी जिल्हाधिकाऱ्यांना पारंपारिक वाद्य आणि पारंपारिक बँड हे वाजविण्यास परवानगी देण्यात यावी अशी मागणी निवदेनाद्वारे केले.

प्रशासनाने सहकार्याची भावना ठेवावी : गणेशाेत्सव मंडळे

जिल्ह्यातील गणेशोत्सव मंडळाचे कार्यकर्ते प्रशासनाला सहकार्य करत असतात, मात्र प्रशासनाने आडमुठेपणाची भूमिका घेतल्याने ग्रामस्थांत तीव्र असंतोष आहे. प्रशासनाने कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊन पारंपारिक वाद्य आणि पारंपारिक बँडला परवानगी द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे.

Edited By : Siddharth Latkar

nandurbar, ganesh festival 2023
Sugarcane Prohibited Issue : बंदी आदेश ऊसाच्या सरीत गाडून टाकू; राजू शेट्टींचा सरकारला इशारा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com