Nandurbar News: त्या विद्यार्थ्यांचा मृत्यू आदिवासी विकास विभागाचा दुर्लक्षामुळे; आमदार पाडवी यांचा आरोप

Nandurbar News त्या विद्यार्थ्यांचा मृत्यू आदिवासी विकास विभागाचा दुर्लक्षामुळे; आमदार पाडवी यांचा आरोप
K C Padvi Nandurbar News
K C Padvi Nandurbar NewsSaam tv
Published On

सागर निकवाडे

नंदूरबार : तळोदा प्रकल्पात असलेल्या तोरणमाळ शासकीय आदिवासी आश्रम शाळेत पहिलीत शिकणाऱ्या डेबा तडवी या सहा वर्षीय (Student) विद्यार्थ्यांचा मृत्यू शाळेत झाला. हा विद्यार्थी तीन दिवसांपासून त्याची प्रकृती खराब आसल्याने तो शाळेतील वसतीगृहातील रूममध्ये झोपलेला असताना त्याचा मृत्यू झाला. विद्यार्थ्यांचा मृत्यू (Death) हा आदिवासी विकास विभागाच्या दुर्लक्षामुळे झाल्याचा आरोप माजी मंत्री के. सी. पाडवी (K C Padvi) यांनी केला आहे. (Tajya Batmya)

K C Padvi Nandurbar News
Tuljabhavani Mandir: तुळजापूरमध्ये बोगस पुजारी; भाविकांच्या फसवणूकीचे प्रकार

आदिवासी विकास विभागाचा कारभारावर माजी आदिवासी विकास मंत्री के. सी. पाडवी यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. विद्यार्थ्यांच्या आरोग्य तपासणीसाठी असलेले आदिवासी विकास विभागाचे वैद्यकीय पथक शाळांमध्ये येत नाही का? विद्यार्थ्यांची प्रकृती खराब असताना शिक्षकांनी त्याकडे दुर्लक्ष का केले? आदिवासी विकास मंत्री आणि आदिवासी विकास विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा विभागाच्या (Ashram School) अधिकाऱ्यांवर वचक नाही का? आदिवासी विद्यार्थ्यांचा सुरक्षितता आणि आरोग्या संदर्भात आदिवासी विकास विभाग आणि राज्य शासन गंभीर नसल्याचा या घटनेवरून समोर येत असल्याचे पाडवी यांनी सांगितले. विद्यार्थी मृत्यूप्रकरणी दोषींवर कारवाई करावी. 

K C Padvi Nandurbar News
Bus Accident: मोठा अपघात टळला; धावत्या बसचे टायर निखळले, सुदैवाने ६२ प्रवाशांचा वाचला जीव

सेंटर किचनचीही चौकशी करा 

राज्यातील आश्रम शाळांमधील सर्व विद्यार्थ्यांचे आरोग्य तपासणी ही दर महिन्याला करण्यात यावी; त्यासोबत विद्यार्थ्यांच्या (Nandurbar) जेवनावरून अनेक तक्रारी असून सेंटर किचनच्या जेवणासंदर्भातही तक्रारी आहेत. या संदर्भात विभागाने चौकशी करून योग्य ती कारवाई करावी; अशी मागणी माजी मंत्री पाडवी यांनी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com