Cyber Crime: बॅंक खात्‍यातील पैसे वाचविण्यासाठी गमावले एक लाख १६ हजार; अनोळखीला सांगितला ओटीपी

बॅंक खात्‍यातील पैसे वाचविण्यासाठी गमावले एक लाख १६ हजार; अनोळखीला सांगितला ओटीपी
Cyber Crime
Cyber CrimeSaam tv
Published On

तळोदा (नंदुरबार) : येथील अल्युमिनियम फर्निचरचे मिस्तरी मुकेश बन्सीलाल पवार यांच्या बँक खात्यातून एक लाख १६ हजार ९१५ रुपये ई- फसवणूकीद्वारे (Cyber Crime) काढून घेतल्याची घटना घडली आहे. याबाबत तक्रारदार मुकेश पवार यांनी ऑनलाइन सायबर पोलिसात (Cyber Police) तक्रार दाखल केली आहे. (Live Marathi News)

Cyber Crime
Maval News: मुलगी झाली हो..वीस वर्षानंतर कुटुंबात आली मुलगी; फुलांची आरास करत स्‍वागत, गावात वाटली मिठाई

मुकेश बन्सीलाल पवार यांना फोन आला व त्यांना सांगितले, एसबीआयमधून बोलतोय. तुमच्या खात्यात बरीच रक्कम कधीपासून (Nandurbar News) पडून आहे. कुठलाही व्यवहार कधीपासून केला नसल्याने तुम्हाला पेनल्टी लागेल आणि यात तुमचे पैसे कापले जाईल. पेनल्टी वाचवण्यासाठी रिमोट कंट्रोल ॲप डाऊनलोड करा व ओटीपी येईल; तो मला द्या. त्यातून तुमचा सर्व पैसा सुरक्षित राहील. त्यामुळे पैसे वाचविण्यासाठी समोरच्या व्यक्तीच्या सांगण्यानुसार मुकेश पवार सर्व प्रकिया करत गेले.

डेबीट कार्डचा वापर

त्यानंतर त्यांच्या डेबीट कार्डचा आठ वेळा उपयोग होत, अकाऊंटमधील रक्कम कमी होत, क्षणार्धात अकाऊंटमधून एक लाख १६ हजार ९१५ रुपये कमी झाले. अकाउंटमधून आपले पैसे काढले गेले आहेत. हे समजल्यावर मुकेश पवार यांनी पोलिस स्टेशनमध्ये व सायबर सेलकडे तक्रार दाखल केली आहे. तसेच, याबाबत तळोदा एसबीआय बँक शाखेच्या व्यवस्थापकांना ही अर्ज देऊन खात्यात पैसे परतावासाठी प्रयत्न करण्याचे पत्र दिले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com