Nandurbar: शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ; झणझणीत मिरचीचे दर कोसळले, 5 दिवस बाजार बंद

Nandurbar News: मागील आठवडा भर असलेल्या ढगाळ वातवरणामुळे मिरची वळण्यास वेळ लागत असल्याने नवीन खरेदी केलेली मिरची टाकण्यासाठी जागा नाहीये.
Nandurbar
NandurbarSaam TV
Published On

सागर निकवाडे

Nandurbar Chilli Market:

राज्यातील सर्वात मोठा मिरची उत्पादक जिल्हा म्हणून नंदुरबार जिल्ह्याची ओळख आहे. मागील वर्षी मिळालेल्या चांगल्या दारानंतर जिल्ह्यात मिरची क्षेत्रात वाढ झाली. नंदुरबारमध्ये या वर्षी मिरचीचे विक्रमी उत्पन्न झाले आहे. मात्र तरीही शेतकरी अडचणीत सापडलाय.

Nandurbar
Red Chillie : अवकाळी पावसाची भीती; झाकून ठेवलेल्या मिरचीला कीड लागण्याची शक्यता

बाजार समितीमध्ये मिरची वाळवण्यासाठी जागा नाहीये. तसेच मिरचीचे दर कमी झालेत. तसेच खरेदीसाठी व्यापरी हवे तेवढे नाहीत. त्यामुळे काही दिवस खरेदी विक्री बंद होती. अशात आता अजून तीन दिवस बाजार समित्या बंद राहणार आहेत. मिरचीचे भाव घसरल्याने आणि मार्केट बंद राहणार असल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे.

देशातील मिरचीसाठी दुसऱ्या क्रमांकाची बाजार पेठ म्हणून नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीची ओळख आहे. या वर्षी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात मिरचीचे लागवड क्षेत्र वाढल्याने मिरचीच्या उत्पादनात वाढ झाली आहे. मागील आठवडा भर असलेल्या ढगाळ वातवरणामुळे मिरची वळण्यास वेळ लागत असल्याने नवीन खरेदी केलेली मिरची टाकण्यासाठी जागा नाहीये.

आतापर्यंत २ लाख क्विंटल मिरचीची आवक झाली आहे. अजून मार्च महिन्यापर्यंत मिरचीची आवक सुरु राहणार आहे. या वर्षी तीन लाख क्विंटल मिरचीची आवक होण्याची शक्यता आहे. या वर्षी मिरची आवक असली तरी सुरवातीला मिरचीला ४ हजार ते ७ हजारपर्यंत दर होते. मात्र आता काही कारणांमुळे मिरचीची निर्यात बंद झाल्याने मिरचीचे दर कोसळले आहेत. बाजार समितीमध्ये २ ते ३ हजार रुपायांपर्यंत दर मिळत आहेत. अशी माहिती बाजार समितीच्या वतीने देण्यात आली आहे.

शनिवार रविवार तसेच सोमवारी संक्रांत असल्याने तीन दिवस लिलाव बंद राहणार आहे. या महिन्यात ७ दिवस विविध कारणांनी लिलाव बंद असल्याने शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत.

Nandurbar
Rajasthan Crime News : प्रेमाचा भयंकर शेवट; रात्री घरी भेटायला गेलेल्या प्रियकरानं प्रेयसीला निर्घृणपणे संपवलं

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com