Accident News: भयंकर! बस रिव्हर्स घेताना प्लॅटफॉर्मवर बसलेल्या आजी आणि नातीला जोरदार धडक; आजीचा मृत्यू, नवापूर स्थानकातला धक्कादायक प्रकार

Nandurbar Accident News : नंदुरबारच्या नवापूर बसस्थानकात बस रिव्हर्स घेताना झालेल्या भीषण अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला असून तिची नात गंभीर जखमी झाली आहे. या प्रकरणी पोलीस तपास सुरू आहे.
Accident News : भयंकर! ST बसची आजी आणि नातीला जोरदार  धडक,  महिलेचा  मृत्यू; नवापूर स्थानकातला धक्कादायक प्रकार
Nandurbar Accident NewsSaam Tv
Published On
Summary
  • नवापूर बसस्थानकात भीषण अपघात

  • बस रिव्हर्स घेताना आजी-नातीला धडक

  • महिलेचा मृत्यू; नात गंभीर जखमी

  • नागरिकांमध्ये संताप व गोंधळ

नंदुरबारच्या नवापूर बस स्थानकात एक भीषण अपघात घडला आहे. बस बस्थानकात लावताना चालकाने बस पाठीमागे घेतली. यावेळी प्लॅटफॉर्मवर बसलेल्या महिलेला आणि तिच्या नातीला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात एका निष्पाप महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर तिची नातं गंभीर जखमी झाली. जखमी मुलीवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दरम्यान या घटनेने परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. या घटनेमुळे परिवहन व्यवस्थेच्या सुरक्षिततेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ५० वर्षीय महिला कमूबाई गोठारिया गावीत आणि त्यांची १५ वर्षाची नात नितीक्षा वळवी या दोघी नवापूर बस स्थानकात बसची वाट पाहत बसल्या होत्या. याच दरम्यान शहादा आगाराची शहादा-सुरत मार्गावरील बस ही स्थानकात लावताना चालकाने बस पाठीमागे घेतली. यावेळी प्लॅटफॉर्मवर बसलेल्या कमूबाई आणि त्यांची नातं नितीक्षा यांना बसची जोरदार धडक बसली.

Accident News : भयंकर! ST बसची आजी आणि नातीला जोरदार  धडक,  महिलेचा  मृत्यू; नवापूर स्थानकातला धक्कादायक प्रकार
Political News : काँग्रेस नेत्याची घरात घुसून हत्या, गाढ झोपेत असतानाच धारदार शस्त्राने हल्ला करत जागीच संपवलं

या अपघातात कमूबाई आणि त्यांची नातं गंभीर जखमी झाल्या. स्थानिक नागरिकांनी तातडीने त्यांना उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले, मात्र उपचार सुरू असतानाच कमूबाई यांचा मृत्यू झाला. तसेच नितीक्षा हीच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर बस स्थानक परिसरात मोठा गोंधळ उडाला. संतप्त नागरिकांनी चालक व वाहकाच्या निष्काळजीपणावर तीव्र नाराजी व्यक्त केली. घटनेची माहिती मिळताच नवापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत चालक आणि वाहकाला ताब्यात घेतले असून, पुढील तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com