मुलगी पाहण्यासाठी जाताना काळाचा घाला, इंजिनिअर तरूणासह दोघांचा अपघातात मृत्यू

Deadly Road Mishap on Nanded-Nagpur Highway: नांदेड जिल्ह्यात भीषण अपघात. सॉफ्टवेअर इंजिनिअरसह एका महिलेचा मृत्यू. महामार्गावर तीन वाहनांचा अपघात.
Deadly Road Mishap on Nanded-Nagpur Highway
Deadly Road Mishap on Nanded-Nagpur HighwaySaam Tv News
Published On
Summary
  • नांदेड जिल्ह्यात तीन वाहनांचा भीषण अपघात.

  • ३ वाहनांची एकमेकांना धडक.

  • दोघांचा मृत्यू. ८ जण जखमी.

नांदेड जिल्ह्यात एक भीषण अपघाताची घटना घडली आहे. मुलगी पाहण्याच्या कार्यक्रमासाठी जात असताना सॉफ्टवेअर इंजिनियरसह एका महिलेचा मृत्यू झाला आहे. हदगाव तालुक्यातील भानेगाव फाट्याजवळ तीन वाहनांचा विचित्र अपघात झाला. या भीषण अपघातात आठ जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर सध्या खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहे.

या भीषण अपघाताची घटना नांदेड ते नागपूर महामार्गावरील हदगाव तालुक्यातील भानेगाव फाट्याजवळ घडली. महामार्गावर तीन वाहनांचा विचित्र अपघात घडला. लातूर येथून देवगुरे परिवार चंद्रपूर येथे मुलगी पाहण्यासाठी जात होते. नांदेडच्या हदगाव तालुक्यातील भानेगाव फाट्याजवळ येताच तीन वाहनांचा विचित्र अपघात झाला.

Deadly Road Mishap on Nanded-Nagpur Highway
मोलकरणीसोबत शारीरिक संबंध अन्.. पत्नीनं पुस्तकातून बॉलिवूड अभिनेत्याबद्दल केले धक्कादायक खुलासे

अपघातात मुलगी पाहण्यासाठी जाणाऱ्या सॉफ्टवेअर इंजिनिअरचा जागीच मृत्यू झाला. तर, त्या तरूणासह आणखी एका महिलेचा मृत्यू झाला. तर आठ जण या अपघातात जखमी झाले. अपघात घडल्यानंतर स्थानिकांनी तातडीने धाव घेतली. तसेच पोलिसांना याची माहिती देण्यात आली.

Deadly Road Mishap on Nanded-Nagpur Highway
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात पर्यटकांसाठी नवी सेवा; ई बग्गीची सुरूवात

पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमी लोकांना जवळच्या रूग्णालयात पाठवले. डॉक्टरांनी तपासून दोन जणांना मृत घोषित केले. तर, इतर ८ जणांवर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com