
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात ई-बग्गी सेवेचे लोकार्पण
वनमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते बगीचे लोकार्पण
ई-बग्गीबाबत गणेश नाईक नेमकं काय म्हणाले?
संजय गांधी राष्ट्रीय उद्यान प्रशासनाच्यावतीनं पर्यावरणपूरक प्रवासाला प्रोत्साहन देण्यासाठी मोठं पाऊल उचलण्यात आलं आहे. या भागात ई बग्गी सुरू करण्यात आली आहे. या उपक्रमाचे उद्घाटन राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते करण्यात आले आहे. पर्यटकांना उद्यानात स्वच्छ, शांत आणि प्रदूषणमुक्त प्रवासाचा अनुभव देण्यासाठी ही सेवा सुरू करण्यात आली असल्याचं वनमंत्री म्हणाले.
वनमंत्री गणेश नाईक म्हणाले की, 'आलेल्या पर्यटकांना संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात स्वच्छ, शांत आणि प्रदूषमुक्त प्रवासाचा अनुभव देण्यासाठी ही खास सेवा सुरू करण्यात आली आहे. या हरित उपक्रमाला नागरिकांच्या सहभागातून अधिक बळ मिळेल, असे उद्यान प्रशासनाने आवाहन केले आहे', असं नाईक म्हणाले.
यावेळी शिवसेना शिंदे गटाचे आमदार प्रकाश सुर्वे, बोरिवली पश्चिमचे आमदार संजय उपाध्याय आणि विधान परिषदेचे आमदार प्रवीण दरेकर आदी मान्यवर उपस्थित होते. आज नॅशनल पार्कमध्ये दहा बग्गी आणण्यात आल्या आहे. या सर्व बग्गी चालवण्यासाठी आदिवासी महिलांना संधी देण्यात आली. लवकरच इथे ५०पेक्षा अधिक बग्गी आणून पर्यटकांना सेवा देण्याबरोबरच स्थानिक आदिवासींना अधिकाधिक रोजगार देण्याचा प्रयत्न सरकार करेल, असे मत वनमंत्री गणेश नाईक यांनी व्यक्त केले.
ई वाहनाबाबत गणेश नाईक म्हणाले, 'नॅशनल पार्कमध्ये पूर्वी पेट्रोलच्या गाड्या होत्या. आता इलेक्ट्रिक वाहन आणल्या आहेत. या इलेक्ट्रिक वाहन स्थानिक महिलांना देण्यात आल्या आहेत. यातून पर्यावरणपूरक वातावरण निर्माण होईल', असं वनमंत्री गणेश नाईक म्हणाले. 'भविष्यकाळात नॅशनल पार्क जनतेच्या सेवेकरिता कायम तत्पर राहिल. इथल्या अडचणी लवकर सोडवल्या जातील', असंही नाईक म्हणाले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.