Nanded News: देव, देव्‍हारे जिल्हाधिकारींकडे करणार जमा; जात पडताळणी समितीच्‍या अजब निर्णयाने आदिवासी कोळी समाज संतप्‍त

देव जिल्हाधिकारी कार्यालयात करणार जमा; जात पडताळणी समितीच्‍या अजब निर्णयाने आदिवासी महादेव कोळी समाज संतप्‍त
Nanded News
Nanded NewsSaam tv
Published On

नांदेड : देवपुजा करता म्हणून आदिवासी महादेव कोळी समाजाचे जात वैधता प्रमाणपत्र जात वैधता पडताळणी समितीने नाकारल्याचा अजब प्रकार (Nanded) नांदेडमध्ये समोर आला. या विरोधात आदिवासी महादेव कोळी समाज उद्या जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढत देव, देवतां, देव्हारे जिल्हाधिकारी कार्यालयात जमा करणार आहे. (Live Marathi News)

Nanded News
Gautami Patil: लावणी डान्सर गौतमी पाटीलच्या नावाने ‘गौतमी थाळी’; काय आहे स्‍पेशल पाहा..

नांदेडमध्ये आदिवासी महादेव कोळी समाजाचे जातीचे वैधता प्रमाणपत्र देण्यासाठी जात पडताळणी समितीने अजब दावा करत वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या डॉ. मयुरी पुंजरवाड या विद्यार्थीनीला जात वैधता प्रमाणपत्र देण्यास नकार दिला आहे. हा धक्कादायक प्रकार नांदेड जिल्‍ह्यातील हदगाव तालुक्यातील खरटवाडी येथील डॉ. मयुरी हिचे एमबीबीएसचे (Education) शिक्षण पुर्ण झाले.

तिच्‍या करीअरचे काय?

पुढील एमडी शिक्षणासाठी तिला जात वैधता प्रमाणपत्र आणण्यासाठी सांगण्यात आले. मात्र, जात पडताळणी समितीने तुम्ही देवपुजा करता म्हणून जातीचे प्रमाणपत्र नाकारले आहे. विशेष म्हणजे डॉ. मयुरीचे वडील श्रीकृष्ण पुंजरवाड हे शिक्षक आहेत. त्यांचे २००८ मध्ये जात वैधता प्रमाणपत्र वैध ठरले आहे. जातपडताळणीच्या अजब निर्णयामुळे डॉ. मयुरीचे पुढील करियरचे मोठे नुकसान होणार आहे.

संतप्‍त समाज काढणार मोर्चा

जातपडताळणी समितीच्या अजब निर्णयामुळे महादेव कोळी समाज संतप्त झाला. त्यामुळे उद्या जात पडताळणी समितीचा निषेध करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून देव देवता, देव्हारे हे जिल्हाधिकारी कार्यालयात जमा करणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com