संतोष जोशी
Nanded News: नांदेडमध्ये ऊसतोड कामगाराच्या पाच वर्षीय मुलाच्या अंगावर उकळते पाणी पडून गंभीर भाजल्याने त्याचा मृत्यू झालाय. ही दुर्दैवी घटना लोहा तालुक्यातील डोलारा येथे घडलीय. या घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. (Latest Nanded News)
मिळालेल्या माहितीनुसार, ऊस तोडणीच्या कामास असलेल्या शिंदे यांनी शेतात दगडाची चूल केली होती. इथेच त्यांनी पाणी तापवत ठेवले होते. थंडी वाजत असल्याने त्यांचा पाच वर्षांचा चिमुकला हा शेक घेण्यासाठी चुलीजवळ बसला होता. त्यावेळी खेळत असताना मोठी दुर्घटना घडली.
खेळताखेळता चुलीवरचे उकळत्या पाण्याचे पातेले चिमुकल्याच्या अंगावर पडले. यात तो गंभीर भाजला. पाणी उकळत असल्याने त्याची कोमल त्वचा हे सहन करू शकली नाही. घटना घडताच त्याच्या कुटुंबियांनी त्याला जवळच्या रुग्णालयात हालवले.
मात्र डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले. आपलं एवढं लहान ५ वर्षांच बाळ आपल्यापासून अशा पद्धतीने दूर जाईल असं आई वडिलांना कधीच वाटलं नव्हतं. मुलाच्या निधनामुळे आई वडिलांना मोठा धक्का बसला आहे. तसेच संपूर्ण गावातून हळहळ व्यक्त केली जात आहे. या प्रकरणी उस्मान नगर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.