धक्कादायक! पूरस्थितीचा आढावा घेण्यासाठी गेलेल्या तहसीलदारांना हृदयविकाराचा झटका

दिगांबर गायकवाड असं ह्रदयविकाराचा झटका आलेल्या तहसिलदारांचं नाव आहे.
Tahsildar Digambar Gaikwad Nanded
Tahsildar Digambar Gaikwad Nanded Saam Tv
Published On

नांदेड : गेल्या सात ते आठ दिवसांपासून नांदेड (Nanded) जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. पावसामुळे (Rain) रस्ते जलमय झाले असून नदी नाल्यांना पूर आलाय. अशातच जिल्ह्यात पूरस्थितीचा आढावा घेण्यासाठी गेलेल्या तहसिलदारांना (Tahsildar) ह्रदयविकाराचा झटका आल्याची धक्कादायक घटना घडली. माहितीनुसार हिमायतनगर परिसरात ही घटना घडली आहे. (Nanded Tahsildar News)

Tahsildar Digambar Gaikwad Nanded
Beed News | जिल्हा परिषद शाळेची भिंत कोसळली; चौथीच्या विद्यार्थ्यांचा हात फ्रॅक्चर

दिगांबर गायकवाड असं ह्रदयविकाराचा झटका आलेल्या तहसिलदारांचं नाव आहे. हिमायतनगर तालुक्यातील पैनगंगा नदीला आलेल्या पुरामुळे पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून घरांची देखील पडझड झाली आहे. यापार्श्वभूमीवर गायकवाड यांनी पूरस्थितीचा आढावा घेतला. मात्र पाहणी करताना त्यांना अचानक ह्रदयविकाराचा झटका आला.

दरम्यान, गायकवाड यांना ह्रदयविकाराचा झटका आल्याचं कळताच, त्यांच्यासोबत असलेल्या इतर अधिकाऱ्यांनी गायकवाड यांना तातडीने रुग्णालयात दाखल केलं. हिमायतनगरच्या खासगी रुग्णालयात प्रथोमपचार केल्यानंतर आता गायकवाड यांना नांदेडच्या एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती आहे. (Nanded Todays News)

Tahsildar Digambar Gaikwad Nanded
Mumbai : झुकेगा नही, गिरेगा!...खड्ड्यांवरुन भाजपची पुष्पा स्टाईलने टीका, पाहा Video

गेल्या आठ दिवसांपासून नांदेड जिल्ह्यात संतधार पाऊस बरसतोय. नांदेड जिल्ह्याची तहान भागवणारा एकमेव प्रकल्प दमदार पावसामुळे 80 टक्के भरला आहे. तर जिल्ह्यात 90 टक्के पेरण्या पूर्ण झाल्या असून जिल्ह्यात आता पर्यंत जवळपास 200 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

गेल्या आठ दिवसापासून होत असलेल्या मुसळधार पावसामुळे किनवट, हिमायतनगर, हदगाव, तामसा, मालेगाव,अर्धापुर,भोकर राष्ट्रीय महामार्गावरील अनेक छोट्या मोठ्या पुलावरून पाणी जाऊन ते वाहून गेल्याने या महामार्गावरील वाहतूकीचा मात्र खोळंबा झाला आहे.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com