Nana Patole On Ajit Pawar: विरोधी पक्षनेते अजित पवार भाजपसोबत जाणार आणि त्यांच्यासोबत राष्ट्रवादीचे काही आमदार जाणार असल्याच्या चर्चा गेल्या आठवड्यात चांगल्याच रंगल्या होत्या. त्यानंतर अजित पवार यांनी या सर्व चर्चांमध्ये काही तथ्य नसल्याचे सांगत जीवंत असेपर्यंत राष्ट्रवादीचंच काम करत राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
परंतु अजित पवारांबाबतच्या या चर्चा काही थाबंत नाहीये. अजित पवारांनी सकाळ माध्यमाला दिलेल्या मुलाखतीत जाहीरपणे मुख्यमंत्री होण्याची इच्छा असल्याचे कबूल केले. २०२४ मध्येच का? आता देखील इच्छा आहे असे अजित पवार म्हणाले. यानंतर आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी यावर बोलकी प्रतिक्रिया दिली आहे.
अजित दादांनी जरूर मुख्यमंत्री व्हावे
राजकारणात असताना मुख्यमंत्री व्हावे असे वाटले तर त्यात गैर काय आहे? १४५ आकडा असेल तर अजित दादांनी जरूर मुख्यमंत्री व्हावे असे नाना पटोले यांनी म्हटले आहे. ते म्हणाले, अजित दादांच्या मनात काय आहे. त्यांबद्दल मी काय बोलणार? राजकीय स्फोट होणार होणार असं म्हटलं जातंय. एकदा लोकशाहीचा स्फोट झाला तर काय? दोन दिवसांपूर्वी ते म्हणाले मी राष्ट्रवादीतच राहणार, आता पुन्हा ते जाणार अशी चर्चा सुरू झाली, असे नाना पटोले म्हणाले.
दरम्यान अजित पवार यांनी या मुलाखतीत अजित पवारांना उद्धव ठाकरे आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्यासोबत काम करतानाचा तुमचा अनुभव कसा होता, असा प्रश्न विचारण्यात आला त्यावर उत्तर देताना अजित पवार म्हणाले, दोघांनाही आमदारकीचा अजिबात अनुभव नव्हता, चव्हाण यांना केंद्रात काम करण्याचा अनुभव होता. पण कधी कधी तुम्ही आनंदाने काम करता, कधी तुम्हाला नाइलाजास्तव काम करावं लागतं. तसं उद्धव ठाकरेंच्या काळात आम्ही आनंदाने समाधानाने काम केलं. पृथ्वीराज बाबांच्या वेळेस वरिष्ठांनी सांगितलं म्हणून नाइलाजास्तव काम केलं, असे अजित पवार म्हणाले. (Latest Political News)
यावर बोलताना नाना पटोले म्हणाले, पृथ्वीराज चव्हाण यांच्याबद्दल अजित पवार जे म्हणाले ते चुकीचे आहे. जर पृथ्वीराज चव्हाण यांच्या कार्याबद्दल आक्षेप होते, तर तेव्हाच सोडून जायला हवे होतं. मनात खदखद कशाला ठेवायची, असे नाना पटोले म्हणाले. तसेच सत्यपाल मलिक यांच्याना सीबीआयने समन्स बजावल्याबाबत बोलताना ते म्हणाले, देश प्रशन विचारत आहे, मोदी उत्तर का देत नाहीत? खरं पाहिले तर पंतप्रधान म्हणून मोदींनी उत्तर द्यायला हवं. परंतु ते ते उत्तर देण्याऐवजी मलिक यांची चौकशी करत आहे. (Latest Marathi News)
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.