Nagpur police guard: शेअर बाजारात फटका, पोलिसाने ड्युटीवर असताना स्वत:वर गोळी झाडली, नागपुरात खळबळ

Nagpur police guard: नागपूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांच्या सुरक्षारक्षकाने स्वत:वर गोळी झाडत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलाय. ही धक्कादायक घटना पोद्दार यांच्या अधिकृत बंगल्यात घडलीय.
Crime News
Crime NewsSaam tv
Published On

नागपूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांच्या सुरक्षारक्षकाने स्वत:वर गोळी झाडत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलाय. ही धक्कादायक घटना जामठा परिसरातील वृंदावन सिटी येथील पोद्दार यांच्या अधिकृत बंगल्यात घडलीय. त्यांच्या बंगल्यात तैनात असलेल्या एका सुरक्षारक्षकानेच सर्व्हिस रिव्हॉल्व्हरने गोळी झाडून आयुष्य संपवण्याचा प्रयत्न केलाय. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

ही धक्कादायक घटना सकाळच्या सुमारास घडलीय. पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांच्या बंगल्यावर गार्ड ड्युटीमध्ये तैनात असलेले पोलीस कर्मचारी विशाल तुमसरे यांनी स्वत: चे आयुष्य संपवण्याचा प्रयत्न केलाय. स्वत:वर गोळी झाडत त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केलाय. त्यांना तातडीने खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहे. मात्र, त्यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर आली आहे.

Crime News
Chhatrapati Sambhaji Nagar: माणुसकीही मेली...मृत महिलेच्या अंगावरील सोनं अन् पैसेही केले गायब, हॉस्पिटलमध्ये नेमकं काय घडलं?

सुरक्षा रक्षकाने अचानक टोकाचे पाऊल का उचलले? अद्याप कारण स्पष्ट झालेले नाही. या घटनेचा अधिक तपास पोलीस अधिकारी करीत आहेत. विशाल तुमसरे यांनी आत्महत्येचा प्रयत्न मानसिक ताण, वैयक्तिक समस्या किंवा इतर कौटुंबिक कारणावरून केला असावा, असा अंदाच वर्तवण्यात येत आहे. मात्र, त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न शेअर बाजारातील गुंतवणूकीत नुकसान झाल्याबद्दल केले असल्याची माहिती समोर आली आहे.

Crime News
Crime news: ब्रेकअपनंतर एक्स बॉयफ्रेंडने मागितले तिच्यावर खर्च केलेले पैसे, नव्या बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला त्याचा काटा

मिळालेल्या माहितीनुसार, शेअर बाजारातील गुंतवणुकीत मोठे नुकसान झाल्यामुळे ते नैराश्यात होते. नैराश्यातूनच सुरक्षा रक्षकाने स्वत:वर गोळी झाडत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलाय. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तपासाला सुरूवात केली असून, सुरक्षा रक्षकाने नेमकं टोकाचे पाऊल कोणत्या कारणामुळे उचलले याचा तपास पोलीस करीत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com