Nagpur: बड्या नेत्याच्या बॉडी बिल्डर लेकाचा प्रताप; ड्रग्ज विकताना पोलिसांनी रंगेहाथ पकडलं; राजकीय वर्तुळात खळबळ

Fitness Champion Caught Delivering MD Drugs: नागपूरमध्ये माजी नगरसेवक अजय बुग्गेवार यांचा मुलगा संकेत बुग्गेवार ड्रग्ज विक्रीप्रकरणी अटक. पोलिसांनी १८.१७ लाखांचा मुद्देमाल जप्त केला असून चौकशी सुरू आहे.
Nagpur Shock Crime News
Nagpur Shock Crime NewsSaam tv news
Published On

नागपूरच्या गुन्हेगारी जगतातून धक्कादायक बातमी समोर येत आहे. माजी नगरसेवकाच्या मुलाला एमडी ड्रग्ज तस्करी करताना पोलिसांनी अटक केली आहे. या धडक कारवाईत पोलिसांनी त्याच्याकडून १.६७ लाख रूपयाच्या एमडी पावडरसह १८.१७ लाख रूपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे. ड्रग्ज विक्री प्रकरणात माजी नगरसेवकाच्या मुलाचे नाव समोर आल्यामुळे नागपूरच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

माजी नगरसेवक अजय बुग्गेवार यांचा मुलगा संकेत बुग्गेवार हा जिम ट्रेनर असून, बॉडी बिल्डर आहे. संकेतनं २०२२ साली दिल्ली येथे बॉडी बिल्डिंग अँड फिटनेस चॅम्पियनशिपमध्ये सुर्वणपदक तसेच मिस्टर इंडिया टायटल जिंकले होते. मिळालेल्या माहितीनुसार, संकेत एमडी ड्रग्जची डिलिव्हरीसाठी जात होता. तो गणेशपेठ येथील मध्यवर्ती बसस्थानकासमोरील रेस्टॉरंटजवळ येणार असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती.

Nagpur Shock Crime News
Pune Crime: देवाच्या आळंदीत लाजिरवाणं कृत्य, तरूणीचे अपहरण करून अब्रुचे लचके तोडले, किर्तनकार महिलेनं रचला कट

गणेशपेठ पोलिसांनी रात्रीच सापळा रचला होता. संकेत आपल्या कारमधून आला. पोलिसांनी त्याला अडविले. नंतर त्याच्या कारची झडती घेतली. दरम्यान, पोलिसांना त्याच्या खिशातून १६.०७ ग्राम एमडी पावडरसह १८.१७लाख रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. नंतर पोलिसांनी संकेतला ताब्यात घेतलं. तसेच पोलिसांकडून तपास सुरू आहे. ड्रग्ज विक्री प्रकरणात माजी नगरसेवकाच्या लेकाचे नाव आल्यानं राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

Nagpur Shock Crime News
Pravin Gaikwad: 'शरद पवारांसाठी मी नातवासारखा' हल्ल्यानंतर प्रविण गायकवाडांना फोन, नेमकं काय बोलणं झालं?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com