Nagpur : कोर्टाच्या पायऱ्या चढताना खाली कोसळले, ६४ वर्षीय वकिलाचा जागीच मृत्यू

Nagpur Lawyer Ankush Pantwane Death : नागपूरमध्ये ज्येष्ठ वकील अंकुश पानतावणे यांचा न्यायालयात हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. या घटनेमुळे वकिली क्षेत्रात शोककळा पसरली आहे.
Nagpur 64 Years Old Lawyer Ankush Pantwane Death By Heart Attack
Nagpur 64 Years Old Lawyer Ankush Pantwane Death By Heart Attack Saam Tv
Published On
Summary
  • नागपूर न्यायालयात ज्येष्ठ वकीलांचा मृत्यू

  • हृदयविकाराचा झटका येऊन ते कोसळले

  • रुग्णालयात नेण्यापूर्वीच मृत्यू

  • वकिली क्षेत्रात शोककळा पसरली

पराग ढोबळे, नागपूर

Nagpur 64 Years Old Lawyer Ankush Pantwane Death By Hert Attack नागपूरमधून मोठी बातमी समोर आली आहे. नागपूरमधील ज्येष्ठ वकील अंकुश पानतावणे यांना न्यायालयात हृदय विकाराचा झटका आल्याने त्यांचा मृत्य झाला. या घटनेने ॲड. पानतावणे यांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून वकिली क्षेत्रातून हळहळ व्यक्त केली जात आहे. ॲड. पानतावणे हे कुटुंब न्यालयाचे वकील संघटनेचे सहचिव ॲड. निलेश पानतावणे यांचे वडील आहेत.

मिळलेल्या माहितीनुसार,ॲड. अंकुश पानतावणे हे ६४ वर्षांचे होते. त्यांच्या नातेवाईकांचे मंगळवारी निधन झाले. त्यानिमित्ताने ते चंद्रपूर येथे गेले होते. चंद्रपूर येथून काम आटपून त्याच दिवशी रात्री ते नागपूरला परतले. त्यानंतर नेहमीप्रमाणे ते मॉर्निंग वॉकला चालायला गेले. दुपारी १२ - १२ :३० च्या सुमारास ते कुटुंब न्यायालयात आले.

Nagpur 64 Years Old Lawyer Ankush Pantwane Death By Heart Attack
Political News : आधी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, आता पोलिसांकडून अटक; बड्या नेत्याला बेड्या ठोकल्याने राजकीय वर्तुळात खळबळ

न्यायालयाच्या पहिल्या मजल्यावर पायऱ्या चढत असताना ॲड. अंकुश पानतावणे यांच्या छातीत जोरात कळ आली. ही कळ इतकी वेदनादायी होती की ते जागीच कोसळले. त्यानंतर त्यांना न्यालयातील उपस्थित लोकांनी रुग्णालयात तातडीने हलवले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. या घटनेने ॲड. पानतावणे यांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com