Nagpur: 'शैक्षणिक कामासाठी मुलींचे अर्धनग्न फोटो पाठवा' शाळेतील कामाची बतावणी करून पालकांना फसवलं

Nagpur Schoolgirl Parents Fooled by Fake Official: आठवी आणि नववीत शिकणाऱ्या विद्यार्थिनींच्या पालकांना फसवून शैक्षणिक कामाचे कारण देत अर्धनग्न फोटो मागविण्याचा प्रकार नागपुरात उघडकीस आला.
Nagpur
NagpurSaam
Published On

नागपूर शहरातून अत्यंत धक्कादायक बातमी समोर येत आहे. आठवी आणि नववीत शिकणाऱ्या विद्यार्थिनींच्या पालकांना फसवून शैक्षणिक कामाचे कारण देत अर्धनग्न फोटो मागविण्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी पालकांनी पोलिसांत धाव घेत अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा सायबर कायद्याअंतर्गत तपास सुरू आहे.

नागपूरच्या महाल परिसरातील एका शाळेत हा धक्कादायक प्रकार घडला. संबिधत अज्ञात आरोपीने शाळेतील शैक्षणिक अधिकारी असल्याचे भासवत व्हॉट्सअ‍ॅप मेसेजद्वारे पालकांशी संपर्क साधला. सुरूवातीला शैक्षणिक कामासाठी मुलींचा पासपोर्ट साइज फोटो मागितला. पालकांनी देखील कुठलीही खातरजमा न करता अनोळखी व्हॉट्सअॅप क्रमांकावर मुलींचे पासपोर्ट फोटो पाठवले.

Nagpur
10th SSC Result: दहावीचा निकाल जाहीर! नागपूर तळाशी, कोकणने परंपरा राखली; पाहा कुठल्या विभागाचा किती टक्के निकाल लागला

नंतर अज्ञात आरोपीची मागणी वाढली. आरोपीने शासकीय योजनेच्या नावाखाली पालकांकडे मुलींचे अर्धनग्न फोटो मागवले. अर्धनग्न फोटोंची मागणी केल्याने पालकांना संशय आला. त्यांनी थेट या प्रकरणाची माहिती शाळेतील शिक्षकांना दिली. शाळेतील शिक्षक या प्रकरणाच्या मुळाशी गेले. त्यानंतर गैरप्रकार उघडकीस आला.

Nagpur
Kolhapur: अंबाबाई अन् जोतिबा मंदिरात शॉर्ट ड्रेसला मनाई, पश्चिम देवस्थान समितीचा निर्णय

शाळेने या संदर्भात तपास केल्यानंतर १५ ते १६ विद्यार्थिनींच्या पालकांसोबत असा प्रकार घडल्याचे समोर आले. पालकांनी तातडीने कोतवाली पोलीस ठाण्यात धाव घेत पोलिसांना याची माहिती देत अज्ञात आरोपीविरोधात तक्रार दाखल केली. पालकांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार, पोलिसांनी अज्ञात आरोपीविरोधात सायबर कायदा व इतर संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल केला. पोलीस याप्रकरणाचा सखोल तपास करीत आहेत.

Nagpur
Mumbai political: मुंबईत ठाकरे गटाला जबरदस्त धक्का, महत्त्वाच्या शिलेदाराने निवडणुकीपूर्वीच सोडली साथ

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com