नागपूर रेड लाईट एरिया समर्थक आणि विरोधक आमने सामने

नागपूर गंगा जमुना परिसरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली असून, गंगा जमुना रेड लाइट एरिया उठवावा याचे समर्थन करणारे आणि हा परिसर इथेच रहावा याचे समर्थन करणारे आमने सामने आले आहेत.
नागपूर रेड लाईट एरिया समर्थक आणि विरोधक आमने सामने
नागपूर रेड लाईट एरिया समर्थक आणि विरोधक आमने सामनेमंगेश मोहिते
Published On

मंगेश मोहिते

नागपूर : नागपूर शहराच्या मध्यवर्ती भागात असणाऱ्या 'रेड लाईट' एरिया गंगा जमुना परिसरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली असून, गंगा जमुना रेड लाइट एरिया उठवावा यासाठी समर्थन करणारे आणि हा परिसर इथेच रहावा यासाठी समर्थन करणारे आमने सामने आले आहेत. याच वादाच्या पार्शवभूमीवर नागपूरचा गंगा जमुना रेड लाईट एरिया पोलिसांनी आठ दिवसांपासून सील केला असून जमाव बंदीचे कलम 144 लागू करण्यात आले आहे.

नागपूर शहरातील 300 वर्ष जुना आणि कुप्रसिद्ध गंगा जमुना परिसर नागपूर पोलीस आयुक्त यांनी आठ दिवस झाले सील केला आहे. याठिकाणी कलम 144 लागू करण्यात आले आहे. याच्याच विरोधात सामाजिक कार्यकर्त्या आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अर्बन सेलच्या अध्यक्ष ज्वाला धोटे यांनी 15 ऑगस्ट रोजी या भागातील पोलिसांकडून लावण्यात आलेले बॅरिकेट्स हटवले होते.

नागपूर रेड लाईट एरिया समर्थक आणि विरोधक आमने सामने
लग्नाळू मुलांसमोर मुहूर्ताचा पेच; पुढचे चार महिने मुहूर्तच नाही!

आज पुन्हा या भागात समर्थक आणि विरोधी गट आमने सामने आलेले पहायला मिळाले. परिसरातील नागरिक आणि नगरसेवक ही वस्ती उठवण्याच्या समर्थनार्थ पोलिसांचं समर्थन करत आहेत. तर, दुसऱ्या बाजूला सामाजिक कार्यकर्त्या ज्वाला धोटे या वारांगना पोलिसांचं आणि परिसरातील स्थानिकांनाच विरोध करताना पहायला मिळाल्या.

Edited By : Krushnarav sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com