लग्नाळू मुलांसमोर मुहूर्ताचा पेच; पुढचे चार महिने मुहूर्तच नाही!

कोरोना निर्बंध शिथिल झाल्यानंतर लग्नाळू मुलांसमोर मुहूर्ताचा पेच; तर, मंगल कार्यालय, फोटोग्राफर, मंडप, बँडबाज्यावाल्यासमोर पुन्हा एकदा आर्थिक संकट...
लग्नाळू मुलांसमोर मुहूर्ताचा पेच; पुढचे चार महिने मुहूर्तच नाही!
लग्नाळू मुलांसमोर मुहूर्ताचा पेच; पुढचे चार महिने मुहूर्तच नाही!विनोद जिरे
Published On

बीड - कोरोना महामारीमुळं गेल्या दीड वर्षापासून, लग्न समारंभांवर मोठे निर्बंध लावले गेले होते. यामुळं लग्नाळू तरुणांसह मंगल कार्यलय, फोटोग्राफर, मंडपवाले, बँडबाज्या, घोडेवाला यासह अनेक व्यवसाय बंद पडले होते. मात्र, आता कोरोना रुग्णांचा आकडा कमी झाल्याने, लग्नसमारंभासाठी निर्बंध शिथिल झाले आहेत. मात्र लग्न लावण्यासाठी पुढचे चार महिने मुहूर्तच नसल्याने, लग्नाळू तरुणांसमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. तर मंगल कार्यालय, फोटोग्राफर, मंडप, बँडबाज्यावाल्यासमोर पुन्हा एकदा आर्थिक संकट उभा ठाकलंय.

कोरोनामुळं गेल्या दीड वर्षांपासून लग्न समारंभावर शासनाकडून कठोर निर्बंध लावण्यात आले होते. मात्र शासनाने निर्बंध शिथिल केल्यानंतरही, बीडमध्ये मात्र कोरोनामुळे कठोर निर्बंध होते. आता बीड जिल्ह्यातील कोरोना रुग्णांचा आलेख कमी होत असल्याने, जिल्हा प्रशासनाकडून 200 लोकांचा उपस्थितीमध्ये, लग्नसमारंभाला मंगल कार्यालयात परवानगी दिली आहे. मात्र, आता ही परवानगी मिळूनही लग्नाळू तरुणांपुढे मुहूर्ताचा पेच निर्माण झालाय. लग्नसमारंभासाठी पुढील चार महिने शुभ मुहूर्त नसल्यानं, लग्नाळू मुलांवर नवरीची वाट पाहण्याची वेळ आली आहे.

हे देखील पहा -

बीड जिल्ह्यात जवळपास 150 मंगल कार्यालय असून त्यापैकी एकट्या बीड शहरामध्ये 26 सुज्जत असे मंगल कार्यालय आहेत. दीड वर्षापासून हे मंगल कार्यालय ओस पडलेले होते. मात्र आता जिल्हा प्रशासनाने 200 लोकांच्या उपस्थितीत परवानगी देऊनही, पुढील चार महिने लग्नसमारंभासाठी शुभमुहूर्त नसल्यानं, हे मंगल कार्यालय पुन्हा एकदा ओस पडले आहेत.

तर सध्या ऑगस्ट महिना सुरू असला तरी, केवळ नोव्हेंबर महिन्यातल्या 2-3 तारखेच्या व्यतिरिक्त एकही तारीख बुक नसल्याचं मंगल कार्यालय चालक राहुल चौरे यांनी सांगितलं. जर एक लग्न झालं तर 250 ते 300 लोकांचे घर चालतात. यामध्ये घोड्यावाला, बँडवाला , केटर्स, फोटोग्राफर, भांड्यावाला, स्वयंपाकी, या लोकांचा उदरनिर्वाह चालतो. मात्र आता मुहूर्त नसल्याने या सर्वांवर उपासमारीची वेळ आली आहे. असं देखील राहुल चौरे म्हणाले.

तर याविषयी मंडप व्यवसायिक म्हणाले, की गेल्या दीड वर्षापासून या कोरोणामुळे आमच्या मंडप वाल्यांचे कंबरडे मोडले आहे. जे लोकं लग्न करत आहेत, ते फक्त दहा-वीस जणांमध्ये घरगुती लग्न करत आहेत. यामुळे आमच्या लोकांना रोजगार मिळणं कठीण झालंय. त्यामुळे शासनाने आम्हाला काम करण्याची जास्तीची मुभा द्यावी. अशी मागणी मंडप व्यावसायिक संतोष गोरे यांनी केली आहे.

लग्नाळू मुलांसमोर मुहूर्ताचा पेच; पुढचे चार महिने मुहूर्तच नाही!
फोटो काढण्याच्या मोहात जीव गेलेल्या युवकाचा अखेर मृतदेह सापडला

तर, या सर्वांना सारखचं फोटोग्राफरला देखील, कोरोनाचा फटका बसला आहे. आता पुढील तीन-चार महिने लग्नसमारंभासाठी शुभमुहूर्त नसल्यानं, लग्नाच्या ऑर्डर मिळणे देखील कठीण झालं आहे. बीड शहरात असणाऱ्या प्रतिबिंब फोटो स्टुडिओला एकही लग्नाची ऑर्डर नसल्याने, फोटोग्राफर खेत्रे यांच्यासमोर आर्थिक संकट उभा टाकलाय. यामुळे शासनाने फोटोग्राफरला आर्थिक मदत करावी. अशी मागणी फोटोग्राफर खेत्रे यांनी केली आहे.

दरम्यान गेल्या दीड वर्षापासून कोरोणाचा संकट संपूर्ण व्यवसायावर घोंगावत आहे. मात्र आता हा कोरोना रुग्णांचा आकडा कमी होत असल्याने, जवळपास सर्वच व्यवसायांना सुरू करण्याची परवानगी शासन स्तरावर देण्यात आली आहे. तर, बीड जिल्ह्यात 200 लोकांच्या माध्यमातून लग्न करण्यास देखील मुभा दिली आहे. मात्र, पुढील तीन ते चार महिने लग्नसमारंभासाठी शुभमुहूर्त नसल्याने, लग्नाळू मुलांसमोर पेच निर्माण झाला आहे. तर लग्न व्यावसायिकांसमोर आर्थिक संकट पुन्हा एकदा ओढावला आहे. यामुळे शासनाने मदत करावी, अशी मागणी देखील व्यावसायिकांकडून होत आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com