Nagpur News
Nagpur NewsSaam TV

Nagpur Police: शाईफेक प्रकरणानंतर हिवाळी अधिवेशनात पोलीस अलर्ट; चोख बंदोबस्तासह सोशल मीडियावर असणार नजर

कुठलीही अनुचित घटना घडू नये, यासाठी पोलीस असणार अलर्टवर आहेत.
Published on

नागपूर : राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावरील शाईफेक प्रकरणानंतर हिवाळी अधिवेशनात (Winter Session) पोलीस सतर्क झाले आहेत. प्रत्येक मंत्री आणि नेत्यांना चोख पोलीस सुरक्षा पुरवली जाणार आहे. मंत्री आणि आमदारांच्या सुरक्षेबाबतही पोलिसांनी आढावा घेतला आहे.

कुठलीही अनुचित घटना घडू नये, यासाठी पोलीस असणार अलर्टवर आहेत. शाईफेक प्रकरणाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी सुरक्षा यंत्रणा खबरदारी घेणार आहे. नागपूर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी याबाबत माहिती दिली आहे. (Latest Marathi News)

Nagpur News
MVA Mahamorcha: महाविकास आघाडीच्या महामोर्चाला परवानगी, मात्र 'या' पाच अटींचं पालन करावं लागणार

हिवाळी अधिवेशनाच्या काळात सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यांवर पोलिसांचे विशेष लक्ष असणार आहे. सोशल मीडियावर कायदा सुव्यवस्था बिघडवणारे मेसेज व्हायरल केल्यास कठोर कारवाई केली जाणार आहे. सोशल मीडियावर पेट्रोलिंगमध्ये नागपूर पोलिसांनी वाढ केली असल्याची माहितीही आयुक्तांनी दिली आहे.

अधिवेशन काळात नागपूरात एसआरपीएफच्या सात कंपन्यांसह सात हजार पोलीस तैनात असतील. हिवाळी अधिवेशनावर 68 मोर्चे येणार आहे, या मोर्चांवर सीसीटीव्ही आणि ड्रोनद्वारे पोलिसांचा वॅाच असणार आहे.

Nagpur News
Maharashtra Politics : मविआ महामोर्चा विरुद्ध भाजप आंदोलन; काँग्रेसनं म्हटलं, 'चोराच्या उलट्या बोंबा'...

नागपुरात सध्या 2500 सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. मोर्चे आणि मंत्री, अधिकाऱ्यांचं वास्तव्य असलेल्या परिसरात 400 सीसीटीव्ही अतिरिक्त लावण्यात येणार आहेत, अशी माहितीही पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com