नितीन गडकरींनी सांगितलं काँग्रेसमध्ये न जाण्याचं कारण; म्हणाले, विहिरीमध्ये जीव देईन पण...

आपल्या सुरुवातीच्या काळातील एक संदर्भ देतांना गडकरी यांनी काँग्रेसमध्ये न जाण्याचं कारण सांगितलं आहे.
Nitin Gadkari
Nitin GadkariSaam TV
Published On

नागपूर: 'मी विहिरीमध्ये जीव देईन पण काँग्रेसमध्ये (Congress) जाणार नाही, कारण काँग्रेसची विचारधारा मला पसंत नाही' असं वक्तव्य केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी केलं आहे. आपल्या सुरुवातीच्या काळातील एक संदर्भ देतांना त्यांनी हे वक्तव्य केलं. ते आज नागपूरमध्ये (Nagpur) आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी ते म्हणाले, 'जेव्हा तुम्हाला यश मिळतं आणि त्याचा आनंद फक्त तुम्हाला एकट्याला होतो तेव्हा त्याला काही अर्थ नसतो, पण तुम्हाला यश मिळतं आणि त्याचा आनंद तुमच्यापेक्षा जास्त तुमच्यासोबत काम करणाऱ्या लहानांपासून मोठ्यांना होतो तेव्हा त्याला जास्त महत्त्व असतं.

पाहा व्हिडीओ -

मानवी संबंध ही सगळ्यात मोठी ताकद असते. उद्योग सामाजिक आणि राजकारणामध्ये मध्ये त्याचं जास्त महत्व आहे, म्हणून कधी पण वापरा आणि फेकून द्या; असं काम करू नये. चांगले दिवस असो की वाईट ज्याचा हात एकदा पकडला त्याचा हात पकडून ठेवा, परिस्थितीनुसार बदलू नका.

मी विद्यार्थी प्रतिनिधी असताना माझे मित्र श्रीकांत जिचकार त्यांनी मला एक दिवस म्हणाले, 'तू एक चांगला माणूस आहेस आणि एक चांगला राजकारणी आहे. पण तू एका चांगल्या पक्षात नाही' तेव्हा मी त्याला म्हणालो की, मी विहिरीमध्ये जीव देईन पण काँग्रेसमध्ये येणार नाही.

Nitin Gadkari
Sharad Pawar | 'विचार बदलून क्रांती होत नसेल तर...'; शरद पवार स्पष्टच बोलले

कारण, मला काँग्रेसची विचारधारा पसंत नाही, असा किस्सा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केला सांगितला. तसंच यावेळी त्यांनी आणखी एक किस्सा सांगितला ते म्हणाले, 'आधी आमचा पक्ष निवडणूक हरायचा आणि माझ्या मित्रांनी मला एक पुस्तक भेट म्हणून दिलं होतं त्यातलं वाक्य मला अजूनही आठवतं, युद्धभूमीवर हरल्यावर तो योद्धा संपत नाही पण युद्धभूमी सोडून पळतो तेव्हा तो संपतो.'

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com