Raj Thackeray: 'जातीयवाद, फोडाफोडी...', राज ठाकरेंची शरद पवारांवर टीका, नेमकं काय म्हणाले?

MNS Chief Raj Thackeray Press Conference Nagpur: नागपूरमध्ये राज ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राष्ट्रवादीच्या जन्मापासूनच राज्यात फोडाफोडीचे जातीवादाचे राजकारण सुरू झाले, असे म्हणत शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली.
Raj Thackeray: 'जातीयवाद, फोडाफोडी... राज ठाकरेंची शरद पवारांवर टीका, नेमकं काय म्हणाले?
MNS Chief Raj Thackeray Press Conference NagpurSaamtv
Published On

पराग ढोबळे| नागपूर, ता. २४ ऑगस्ट २०२४

विधानसभा निवडणुकांच्या मोर्चेबांधणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे विदर्भाचा दौरा करत आहेत. सध्या राज ठाकरे नागपूरमध्ये असून जिल्ह्यातील 12 विधानसभा जागेचा ते आढावा घेणार आहेत. आज नागपूरमध्ये राज ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राष्ट्रवादीच्या जन्मापासूनच राज्यात फोडाफोडीचे जातीवादाचे राजकारण सुरू झाले, असे म्हणत शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली. तसेच यावेळी त्यांनी आगामी विधानसभा निवडणुका, महिला अत्याचाराच्या घटनांवरुनही भाष्य केले.

काय म्हणाले राज ठाकरे?

" राज्यामध्ये जातीयवाद फोडाफोडीचे राजकरण याला एकटे शरद पवार कारणीभूत आहेत. पुलोदपासून याला सुरवात झाली. 91 मध्ये शिवसेना फोडली, भुजबळ, नारायण राणे यांना फोडले. हे राजकारण शरद पवार यांनी सुरू केले, जातीचे विष पवार यांनी पेरले. या सर्व गोष्टी राष्ट्रवादीच्य जन्मानंतर सुरू झाल्या, यापूर्वी महाराष्ट्र्र हा असा कधीच नव्हता," असे म्हणत राज ठाकरेंनी शरद पवार यांच्यावर गंभीर आरोप केले.

मतदार राग काढणार!

"प्रत्येकाला निवडणुकीत उभं राहायचे आहे. आमच्यासाठी पोषक वातावरण आहे. लोक मागील पाच वर्षात जे झाले त्याला कंटाळले आहेत. लोकसभेच्या निवडणुकीत ज्या पध्दतीने मतदान झाले, हे मतदान समजून घेतलं पाहिजे. या देशात एक गठ्ठा मुस्लिम समाजाने मोदी शहांविरोधात मतदान केले. भाजपने 400 पार संविधान बदलणार असे वक्तव्य त्यांच्याच लोकांनी केल्याने काही लोकांनी मोदी शाह विरोधात मतदान केले," असेही राज ठाकरे यावेळी म्हणाले.

Raj Thackeray: 'जातीयवाद, फोडाफोडी... राज ठाकरेंची शरद पवारांवर टीका, नेमकं काय म्हणाले?
Maharashtra Politics: शिंदे गटातील वाद चव्हाट्यावर! दिंडोशीमध्ये राडा; विभाग प्रमुख आणि शाखाप्रमुखामध्ये तुफान हाणामारी

महिला अत्याचारावरुन संताप

"महिला अत्याचारात सातत्याने वाढ होत आहे. देशात प्रगत राज्याची राजधानी मुंबईत घटना वाढल्या आहेत. सर्वाधिक गुन्हे मुंबई, पुणे आणि नागपूरमध्ये आहेत. दर तासाला गंभीर गुन्हे दाखल होत आहेत. नोंद नसलेलं अनेक गुन्हे असतील, उत्तर प्रदेश खालोखाल गुन्हे दाखल झाले. इतके दिवस दाखवले जात नव्हते. या बाबतीत कठोर कायदे होत नाहीत," असे म्हणत राज्यातील अत्याचाराच्या घटनांवरुनही राज ठाकरेंनी संताप व्यक्त केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com