Nagpur News : आजीला भेटण्यासाठी 1500 किमीवरून नागपूरला आली अन् घात झाला; महापालिकेच्या 'आपली बस'ने ६ वर्षांच्या बालिकेला उडवलं

Nagpur Accident News : पंजाबवरून नागपूरला आजीला भेटण्यासाठी आलेल्या ६ बर्षांच्या बालिकेला महापालिकेच्या आपली बसने आज चिरडलं. यात बालिकेचा मृत्यू झाला असून संतप्त नागरिकांना बसची तोडफोड केली आहे.
Nagpur News
Nagpur NewsSaam Digital

पराग ढोबळे, नागपूर

नागपूरच्या गणेशपेठ परिसरातील मॉडेल मिलरोडवर महापालिकेच्या आपली बसने 6 वर्षीय बालिकेला धडक दिली. यात बालिकेचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर संतप्त झालेल्या नागरिकांनी बसची तोडफोड केली आहे. चालकाला गणेशपेठ पोलिसांनी घेतलं ताब्यात घेतलं आहे. आराध्या असं मृत मुलीचं ना असून ती पंजाबवरून नातेवाईकांसोबत आजीला भेटायला नागपुरात आली होती आणि आज दुपाही ही दुर्घटना घडली.

Nagpur News
Snake Bite : १५ दिवसात सर्पदंशाने तीन शेतकऱ्यांचा मृत्यू; तळोदा तालुक्यातील घटना

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज दुपारी तीन वाजताच्या सुमारास मॉडर्न मिल चौक परिसरात ही दुर्घटना घडली आहे. आराध्या नागदिवे असं सहा वर्षीय चिमुकलीचे नाव असून ती मूळची जालंदर पंजाब येथील आहे. नागपूर येथील मॉडर्न मिल चाळ परिसरातून महानगरपालिकेचे आपली बस पार्डीमार्गे जात असताना अचानक धावत्या बस समोर आल्याने आराध्याला जोरदार धडक बसली. यात तिचा जागीच मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच, आजूबाजूला असलेल्या नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली. लोकांचा संताप अनावर झाला. यावेळी काहीही आपली बसच्या मागील काच फोडून फोडली. घटनेची माहिती मिळताच गणेशपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी पोहोचले. घटनास्थळी पंचनामा करून पोलिसांनी वाहन चालक सुरेश माणिकराव पारधी याला ताब्यात घेतलं आहे.

Nagpur News
CCTV Footage : तोल गेला अन् महिला रेल्वे ट्रॅकवर पडली; RPF जवानाने जीव धोक्यात घालून वाचवले प्राण, थरारक VIDEO

आराध्या नागदिवे ही पंजाब येथील असून नातेवाईकाकडे लग्नासाठी आजीकडे आली होती. आजी कचरा फेकण्यासाठी रस्ता ओलांडून गेली. तेव्हा आराध्याही तिच्या मागत धावत सुटली. याचवेळी भरधाव जात असेल्या बस समोर आली, ड्रायव्हरला बसवर नियंत्रण मिळवता आलं नाही आणि बस मुलीच्या अंगावरून गेली. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com