''आम्हाला म्हणाले स्वाभिमान हरवला आहे. दिल्लीत जातात, कठपुतळी आहेत. हो आम्ही दिल्लीला जातो, निधी आणतो. केंद्र सरकारने आम्हाला निधी दिला. मागितल्या शिवाय मिळत नाही. प्रयत्न करावा लागतो, त्यासाठी पाठपुरावा करावा लागतो. कडकसिंग बनून चालत नाही', असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केलं आहे.
हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला नागपुरात सरकारच्या वतीने पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी बोलताना मुख्यमंत्री शिंदे असं म्हणाले आहेत. ते म्हणतात गेल्या अडीच वर्षात केंद्र सरकारने पैसे दिले नाही. तुम्ही मागायला हवं होतं. आपल्या अहंकारामुळे त्यांनी राज्यच नुकसान केलं. अनेक प्रकल्प बंद पाडले, अनेक प्रकल्प स्थगित केले, आमचं सरकार आल्यानंतर ती स्थगिती उठवण्यात आल्याचं मुख्यमंत्री शिंदे म्हणाले आहेत. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
अलीकडेच पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले. ज्यात भाजपला तीन राज्यात यश मिळालं आहे. यावर भाष्य करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले आहेत की, ''मोदींचा करिष्मा संपला असं म्हणणाऱ्यांना निवडणुकीतून उत्तर मिळालं आहे. निवडणुकीपूर्वी यांचे आरोप आणि निवडणुकीनंतर याच्या भाषणं कशी आहेत बघा. (Latest Marathi News)
ते म्हणाले, ''या अधिवेशनात विदर्भासाठीचे अनेक महत्वाचे निर्णय सरकार घेईल. समाजातील प्रत्येक घटकापर्यत पोहचण्याचं काम आम्ही केल्याने विरोधकांच्या पायाखालची जमिन सरकली आहे. याची इंडिया आघाडीही तुटली आहे बहुतेक. तीन राज्यांनी दाखवून दिलं, महाराष्ट्रातही चांगला प्रतिसाद आहे.''
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, ''शासन आल्या दारी काल बीडमध्ये कार्यक्रम झाला. दोन कोटी लाभार्तींना मदत झाली. हा इव्हेंट त्यांना वाटत असेल तर लोकांच्या गोष्टी करायला आम्हाला इव्हेंट करायला आवडेल. लाभार्तींची संख्या वाढत आहे. त्यांना जे वाटायचं ते वाटू दे.''
ते म्हणाले, ''अवकाळी पाऊस गारपीटमध्ये आम्ही कुठेही हात आखडता घेणार नाही. बळी राजा आमचा मायबाप आहे. आम्ही त्याच्या तोंडाला पाने पुसणार नाही.'' विरोधी पक्षांनी सरकाराच्या चहापाण्याच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला आहे. यावर बोलताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, ''नागपूरला अधिवेशन असलं की, विदर्भाचे प्रश्न असतात. मात्र विरोधकांनी चहापानच्या कार्यक्रमावरही बहिष्कार टाकला.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.