Maharashtra Politics: 'एल्फिन्स्टन'चं प्रभादेवी झालं,'दादर'चं चैत्यभूमी कधी?; वर्षा गायकवाड यांचा सरकारला सवाल

Maharashtra Politics: राज्य सरकारने एल्फिन्स्टन रोड स्थानकाचं नाव प्रभादेवी करण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला. मग त्याच धर्तीवर कोट्यवधी भीम अनुयायांची मागणी असूनही दादर स्थानकाचं नामांतर ‘चैत्यभूमी’ असं करावं, अशी मागणी मुंबई प्रदेश कॅांग्रेस अध्यक्षा प्रा. वर्षाताई गायकवाड यांनी केली.
Maharashtra Politics
Maharashtra PoliticsSaam Digital
Published On

Maharashtra Politics

राज्य सरकारने एल्फिन्स्टन रोड स्थानकाचं नाव प्रभादेवी करण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला. मग त्याच धर्तीवर कोट्यवधी भीम अनुयायांची मागणी असूनही दादर स्थानकाचं नामांतर ‘चैत्यभूमी’ असं करावं, अशी मागणी मुंबई प्रदेश कॅांग्रेस अध्यक्षा प्रा. वर्षाताई गायकवाड यांनी केली आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६७व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त प्रा. गायकवाड यांनी चैत्यभूमी येथे जाऊन महामानवाला अभिवादन केलं. त्यावेळी या दिवसाचं औचित्य साधून त्यांनी कोट्यवधी भीम अनुयायांच्या मनातील ही मागणी बोलून दाखवली.

२०१८ मध्ये राज्य सरकारने एल्फिन्स्टन रोड स्थानकाचं नाव बदलून प्रभादेवी केलं. ओशिवारा येथे रेल्वे स्थानक बनत असतानाच त्याला राम मंदिर असं नाव दिलं. दादर स्थानकाचं नाव बदलून चैत्यभूमी करावं, ही भीमसैनिकांची मागणी खूप जुनी आहे. त्यामुळे राज्य सरकारने जनभावनेचा आदर करत आता दादरचं नाव चैत्यभूमी करावं, अशी आग्रही मागणी प्रा. गायकवाड यांनी केली.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आयुष्यात दादरला अनन्यसाधारण महत्त्व आहे. दादरलाच राजगृहात ते राहायचे आणि महापरिनिर्वाणानंतर त्यांचे अंतिम विधी येथेच झाले. त्यामुळे राज्यातल्याच नाही, तर देशातल्या आणि जगातल्या भीम अनुयायांच्या भावना दादरशी जोडल्या गेल्या आहेत. दरवर्षी लाखोंच्या संख्येने भीम अनुयायी महापरिनिर्वाण दिनी चैत्यभूमीवर येतात. त्यामुळे त्यांच्या भावनांचा आदर करत या अधिवेशनातच राज्य सरकारने असा प्रस्ताव मंजूर करावा, असं प्रा. गायकवाड यांनी स्पष्ट केलं.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Maharashtra Politics
Manoj Jarange Patil News : आरक्षणासाठी सरकारला सद्बुद्धी दे; मनोज जरांगे पाटील यांनी रेणूका मातेला घातले साकडे

एल्फिन्स्टन रोड या स्थानकाचं नाव बदलण्यासाठी राज्य सरकारने पुढाकार घेतला होता. वास्तविक हे नामांतर व्हावं, ही मागणी एवढी तीव्रही नव्हती. पण कोट्यवधी भीम अनुयायी गेली अनेक वर्षं ही मागणी करत असूनही ती मान्य करण्यात काय अडचण आहे? अशा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.

Maharashtra Politics
Swabhimani Shetkari Sanghatana : 'स्वाभिमानी'ने राज्य सरकारला दिली आठवड्याची मुदत, सळो की पळो करून सोडण्याचा प्रशांत डिक्करांचा इशारा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com