Nagpur Fraud Case : जिल्हा सत्र न्यायाधीशाची साडेतेरा लाख रुपयात फसवणूक; ऑनलाइन गुंतवणुकीच्या नावाखाली गंडा

Nagpur News : न्यायाधीशांचे जवळचे नातेवाईक हे गेल्या अनेक वर्षांपासून फॉल्कन इनव्हॉइस डिस्काउंट या ऑनलाइन कंपनीसोबत गुंतवणुकीचे व्यवहार करत होते. गुंतवणूक केल्यानंतर आकर्षक परतावा देखील मिळत होता
Nagpur Fraud Case
Nagpur Fraud CaseSaam tv
Published On

पराग ढोबळे 

नागपूर : शेअर मार्केट असो किंवा कंपनीत गुंतवणूक करण्याच्या नावाने फसवणूक करण्यात येत असल्याचे प्रकार समोर आले आहेत. मात्र ऑनलाइन गुंतवणुकीच्या नावाखाली नागपूरच्या जिल्हा व सत्र न्यायालयातील एका न्यायाधीशांचीच फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. गुंतवणूक करण्याचे सांगत तब्बल साडेतेरा लाख रुपयांत गंडा घालण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीप्रमाणे नागपूरच्या जिल्हा व सत्र न्यायाधीशाची यात फसवणूक झाली आहे. यामध्ये फसवणूक झालेल्या न्यायाधीशांचे जवळचे नातेवाईक हे गेल्या अनेक वर्षांपासून फॉल्कन इनव्हॉइस डिस्काउंट या ऑनलाइन कंपनीसोबत गुंतवणुकीचे व्यवहार करत होते. यात गुंतवणूक केल्यानंतर त्यांना आकर्षक असा परतावा देखील मिळत होता. चांगला परतावा मिळत असल्यामुळे न्यायाधीशांचे नातेवाईक गुंतवणूक करण्यास सांगत होते. 

Nagpur Fraud Case
Fraud Case : रेल्वे नोकरीचे आमीष; ९ लाख रुपयात फसवणूक; ठाण्यातील दाम्पत्य ताब्यात

सुरवातीला मिळाला परतावा 

दरम्यान नातेवाईकाच्या सांगण्यानंतर न्यायाधीशांनी देखील फॉल्कन इनव्हॉइस डिस्काउंट या कंपनीमध्ये गुंतवणूक केली. सुरवातीला नफा मिळाल्यानं यात टप्प्या टप्प्याने गुंतवणूक वाढवत गेले. साधारण साडेचार वर्षापर्यंत कंपनीत गुंतवणूक सुरु होती. मात्र काही दिवसांपासून त्यांच्या खात्यात नफ्याची रक्कम जमा न झाल्याने कंपनीशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र समोरून कुणीच प्रतिसाद दिला नाही.

Nagpur Fraud Case
Nanded News : पत्नीचे दागिने मोडून खोदली विहीर; मनरेगा अंतर्गत विहिरीच्या अनुदानाची प्रतीक्षाच, शेतकऱ्यांनी दिला उपोषणाचा इशारा

फसवणुकीची पोलिसात तक्रार 

गुंतवणुकीच्या वेळेला दावा करण्यात आलेला परतावा न मिळाल्यानंतर ऑनलाईन गुंतवणुकीच्या नावाखाली फसवणुकीचा गोरखधंदा सुरू करण्यात आल्याचे न्यायाधीशांच्या लक्षात आले. यानंतर त्यांनी लागलीच याची तक्रार पोलिसांकडे केली. याप्रकरणी आणखी काही जणांची फसवणूक झाली आहे का याचा तपास सध्या नागपूर पोलीस करत आहे. तर आरोपींचा शोधही पोलिसांकडून घेतला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com