Santragachi Express : संतरागाछी एक्सप्रेसमध्ये बॉम्ब ठेवल्याची धमकी; पॅंटरीकार कर्मचाऱ्यांशी प्रवाशांचे भांडण झाल्यानंतरचा प्रकार, पथकाकडून तपासणी

Nagpur News : पॅंटरीकारच्या लोकांशी रेल्वेतून प्रवास करणाऱ्या काही मजूर प्रवाशांचे भांडण झाले होते. बराच वेळ वाद झाल्यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली. या वादानंतर हा प्रवाशांना खाली उतरवण्यात आले
Santragachi Express
Santragachi ExpressSaam tv
Published On

पराग ढोबळे 

नागपूर : संतरागाछी एक्सप्रेसमधील पॅन्ट्रीकार मधील कर्मचारीनसोबत काही प्रवाशांचा वाद झाला होता. या वादानंतर एकाने बॉम्ब ठेवल्याच्या धमकी दिली होती. यामुळे रेल्वे प्रशासन अलर्ट झाले होते. लागलीच आरपीएफ आणि जीआरपीएफ तसेच बॉम्बशोधक पथकाकडून एक्सप्रेसमधील सर्व बोग्यांमध्ये जाऊन तपासणी सुरू करण्यात आली. दरम्यान या प्रकारामुळे काही वेळ गोंधळ उडाला होता. 

पश्चिम बंगाल मधून नांदेडच्या दिशेने जाणाऱ्या संतरागाछी एक्सप्रेसमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला आहे. यामुळे प्रवाशांमध्ये देखील गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान संत्रा काची एक्सप्रेसमधील पॅंटरीकारच्या लोकांशी रेल्वेतून प्रवास करणाऱ्या काही मजूर प्रवाशांचे भांडण झाले होते. बराच वेळ वाद झाल्यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली. या वादानंतर हा प्रवाशांना खाली उतरवण्यात आले होते. 

Santragachi Express
Traffic Police : वाहतूक विभागाचा पोलिसांनांच शिस्तीचा धडा; नो पार्किंग मध्ये उभ्या पोलिसांच्या दुचाकींवर दंडात्मक कारवाई

बॉम्ब शोधक पथकाकडूनही तपासणी 

सर्व प्रवाशी मजुरांना गोंदिया रेल्वे स्थानकावर उतरवण्यात आलं. त्यामध्ये ११ मजुरांचा समावेश आहे. या अकरापैकी एका मजुराने रेल्वे बॉम्बने उडून देण्याची धमकी दिली. यामुळे रेल्वे प्रशासनाने खबरदारी म्हणून रेल्वे डब्यांची तपासणी मोहीम सुरू केली आहे. गोंदियापासून सुरू झालेली मोहिमेमध्ये नागपूरात पोहचताच बॉम्बशोधक पथक तथा आरपीएफ आणि जीआरपीएफ कडून शोध घेण्यात आला. 

Santragachi Express
Yavatmal Farmer : सरकारने जमा केलेली रक्कम शेतकऱ्यांने केली परत; अतिवृष्टीची तुटपुंजी मदत दिल्याने शेतकरी संतप्त

त्या प्रवाशांची कसून चौकशी 

दरम्यान रेल्वे बोगीमध्ये करण्यात आलेल्या तपासणीत आतापर्यंत एक्स्प्रेसमध्ये काही मिळून आले नाही. हे पथक रेल्वे सोबतच पुढील प्रवासात तपासणी मोहीम पूर्ण करणार आहे. तसेच गोंदिया आरपीएफ कडून या सर्व मजूर प्रवाशांची कसून चौकशी केली जात आहे. या सर्व प्रकारामुळे रेल्वेमध्ये गोंधळ निर्माण झाला होता. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com