Nagpur-Mumbai Samruddhi Mahamarg: नागपूर-मुंबई महामार्गावर 'समृद्ध' टोलधाड, प्रवासासाठी 1,213 रुपयांचा टोल

राज्य शासनाचा ड्रीम प्रोजेक्ट असलेला समृद्धी महामार्ग (Samruddhi Mahamarg) सर्वसामान्यांच्या परवडणारा नसल्याचं दिसतंय.
Nagpur-Mumbai Samruddhi Mahamarg
Nagpur-Mumbai Samruddhi MahamargSaam Tv
Published On

Nagpur-Mumbai Samruddhi Mahamarg: नागपूर : राज्य शासनाचा ड्रीम प्रोजेक्ट असलेला समृद्धी महामार्ग (Samruddhi Mahamarg) सर्वसामान्यांच्या परवडणारा नसल्याचं दिसतंय. कारण या महामार्गावरून जायचं असेल तर नागपूर ते मुंबईत अशा 700 किलोमीटर अंतरासाठी 1,213 रुपये मोजावे लागणार आहेत. म्हणजे एका किलोमीटर साठी साधारणतः पावणेदोन रुपये द्यावे लागतील. त्यामुळं समृद्धी महामार्गावरुन जाताना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागणार आहे (Nagpur-Mumbai Samruddhi Mahamarg Toll ).

समृद्धी महामार्गाच्या टोल (Toll) वसूलीसाठी टेंडर काढले आहे. त्यात वेगवेगळ्या 26 ठिकाणी टोलनाके उभारले जाणार आहेत. दुसरीकडे, या मार्गावरच्या टेंडरसाठी कोण्या कंपन्यांत स्पर्धा होणार आणि वसुलीचे टेंडर कोणाला मिळणार याची उत्सुकता निर्माण झालीये. मुंबई (Mumbai) ते नागपूर (Nagpur) हा 701.480 किलोमीटर रस्ता आहे. या रस्त्यावर 26 टोल नाक्यांवर तुम्हाला टोल भरावा लागणार आहे. यासाठी ‘एमएसआरडीसी’कडून टेंडर प्रसिद्ध करण्यात आले आहे.

Nagpur-Mumbai Samruddhi Mahamarg
नागपूर: तीन भाषांवर प्रभुत्व असणारी उच्चशिक्षित तरुणी निघाली चोर !

हा मार्ग नागपूर, वर्धा, अमरावती, वाशीम, बुलडाणा, जालना, औरंगाबाद, नगर, नाशिक, ठाणे या दहा जिल्ह्यांतून जातो. तसेच चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, परभणी, नांदेड, बीड, धुळे, जळगाव, पालघर आणि रायगड या 143 जिल्ह्यांना याचा फायदा होणार आहे. मात्र, टोल सर्वसामान्यांना परवडणारा नाहीये. त्यामुळे या टोल दारावर नाराजी व्यक्त केली जात आहे.

वाहनांसाठी टोलचा प्रतिकिलोमीटर येणार खर्च

प्रकार प्रतिकिलोमीटरसाठी टोल (31 मार्च 2025 पर्यंत)

1) कार, जीप, व्हॅन किंवा हलकी वाहने - 1.73 रुपये

2) माल वाहतुकीची वाहने किंवा मिनी बस - 2.79 रुपये

3) ट्रक, बस (दोन आसांची) - 5.85 रुपये

4) 3 आसांची व्यावसायिक वाहने - 6.38

5) अवजड बांधकाम यंत्रसामग्री (एचसीएम) अनेक आसांची वाहने (चार किंवा सहा आसांची) - 9.18

6) अति अवजड वाहने (7 किंवा जास्त आसांची) - 11.17

नागपूरवरुन मुंबईला जाण्यासाठी 1,213 आणि परत येण्यासाठी एवढेच रुपये द्यावे लागणार आहे. त्यामुळं हे दर सर्वसामान्यांना नागरिकांना परवडणारे नसल्यानं त्यांनी नाराजी व्यक्त केलीये.

ज्या सर्वसामान्य शेतकऱ्यांना जमिनी घेऊन हा समृद्धी महामार्ग तयार होतोय त्याच सर्वसामान्यांना हा महामार्ग परवडणारा नसेल. उलट टोल वसुली करणाऱ्या कंत्राटदार यामुळं मालामाल होणार आहे. त्यामुळं हा महामार्ग सर्वसामान्यांसाठी आहे की टोल वसुली करणाऱ्या कंत्राटदारांसाठी असा प्रश्न निर्माण झालाय.

Edited By - Nupur Uppal

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com