नागपूर: तीन भाषांवर प्रभुत्व असणारी उच्चशिक्षित तरुणी निघाली चोर !

नागपूरात २७ वर्षीय तरुणीवर कारवाई
नागपूर: तीन भाषांवर प्रभुत्व असणारी उच्छाशिक्षित तरुणी निघाली चोर !
नागपूर: तीन भाषांवर प्रभुत्व असणारी उच्छाशिक्षित तरुणी निघाली चोर !मंगेश मोहिते
Published On

मंगेश मोहिते

नागपूर : दोन विषयात एम. ए. , तीन भाषांवर प्रभुत्व आणि घरची सधन तरिही नागपूरातील २७ वर्षीय तरुण चोरी करते. नागपूर पोलीस गेल्या काही दिवसांपासून महिलांच्या पर्स चोऱ्यांमुळं त्रस्त होते. चोराचा पत्ता लागत नव्हता. मात्र, आता अखेर या महिला चोराला त्यांनी अटक केली आहे. (Latest Crime News in Marathi)

या तरुणीने आठ वर्षांपूर्वी चोरीचा प्रवास सुरु केला होता. ही तरुणी होस्टेलवर राहत असे. मात्र, घरून मिळालेल्या पैशांवर मौज करता येत नव्हती. त्यामुळं तिने चोरीचा मार्ग पत्करला. काही महिलांबरोबर तिने चोरीला सुरुवात केली.

नागपूर: तीन भाषांवर प्रभुत्व असणारी उच्छाशिक्षित तरुणी निघाली चोर !
औरंगाबाद: स्वतःच्याच मुलीवर अत्याचार करणाऱ्या बापाला जन्मठेप

त्यानंतर हिस्सेवाटणीवर वाद निर्माण झाला. त्यानंतर या तरुणीनं स्वतः चोरी करण्याचा व्यवसाय सुरू केला. आतापर्यंत तिने वीस ठिकाणी चोऱ्या केल्या. या चोरीच्या रकमेतून तिनं मौजमजा केली. दागिने लपवून ठेवले. मात्र, दागिने विक्रीसाठी गेल्यावर सोनार आपले बिंग फोडेल, अशी भीती तिला होती.

हे देखील पहा-

त्यामुळं तिने दागिन्याच्या वस्तू लपवून ठेवल्या होत्या. या तरुणीचे वय सत्तावीस वर्ष आहे. तिच्या घरची परिस्थिती तशी सधन होती. दोन विषयांत ती एम.ए. झाली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी तीनं चोरी केली. त्यानंतर या चोरीची तिला सवयच झाली. गर्दीच्या ठिकाणी जाणे आणि महिलांच्या पर्समधून रोख रक्कम लंपास करणे एवढंच ती काम करत असे. अशाच प्रकारचे गुन्हे घडत असल्यानं पोलीस त्रस्त झाले होते. अखेर तिला पकडण्यात यश आलं. आतापर्यंत तिनं वीस चोऱ्यांची कबुली दिलीय.

उच्चशिक्षित असूनही चोरी का करते हे विचारल्यावर 'आप नही समझोगे' असं गंभीरपणे उत्तर तिनं पोलिसांना दिलं. त्यामुळं उच्चशिक्षित आणि सधन घरची असून तीच्या चोरीचं नेमकं कारण काय ? या उत्तराची प्रतीक्षा पोलिसांना लागलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com