औरंगाबाद: स्वतःच्याच मुलीवर अत्याचार करणाऱ्या बापाला जन्मठेप

स्वतःच्याच मुलीवर अत्याचार करणाऱ्या बापाला जन्मठेप झाली आहे. औरंगाबादच्या सिडको एमआयडीसी पोलिस ठाण्यात पीडितीच्या आईने दोन वर्षांपूर्वी तक्रार दिली होती.
औरंगाबाद: स्वतःच्याच मुलीवर अत्याचार करणाऱ्या बापाला जन्मठेप
औरंगाबाद: स्वतःच्याच मुलीवर अत्याचार करणाऱ्या बापाला जन्मठेपअविनाश कानडजे

अविनाश कानडजे

औरंगाबाद : स्वतःच्याच मुलीवर अत्याचार करणाऱ्या बापाला जन्मठेप झाली आहे. औरंगाबादच्या (Aurangabad) सिडको एमआयडीसी पोलिस ठाण्यात पीडितीच्या आईने दोन वर्षांपूर्वी तक्रार दिली होती. एका मद्यपी बापाने आपल्या तेरा वर्षाच्या मुलीवर वारंवार अत्याचार केला होता. त्याला आता जिल्हा सत्र न्यायालयाने चाळीस हजार रुपये दंड आणि जन्मठेपाची शिक्षा सुनावली आहे. (Aurangabad Crime News In Marathi)

ता. 27 जानेवारी 2019 रोजी साडेआठच्या सुमारास पीडिता आणि घरातील इतर घरांमध्ये झोपले होते, तेव्हा स्वताचा बाप नेहमीप्रमाणे दारूच्या नशेत घरी आला रात्री दहा वाजेच्या सुमारास लहान मुलगा रडू लागला. त्यावेळेस पीडितेची आई मुलाला घराबाहेर फिरवत होती.

औरंगाबाद: स्वतःच्याच मुलीवर अत्याचार करणाऱ्या बापाला जन्मठेप
कोरोनाचा विस्फोट! पटियाला मेडिकल कॉलेजमध्ये 100 विद्यार्थी कोविड पॉझिटिव्ह

यादरम्यान, पीडितेने घराचा दरवाजा आतून लावून घेतला थंडीमुळे दरवाजा लावला असल्याने त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. परंतु पीडितेची आई घरात आल्यानंतर तिने पाहिले की आपला पती अर्धवट कपड्यांवर होता त्यानंतर पीडितेच्या आईने पीडितेला विचारले असता पीडितेने सांगितले की, मला जीवे मारण्याची धमकी देऊन बापानेच लैंगिक अत्याचार (Sexual Assault) केला.

हे देखील पहा-

याशिवाय आतापर्यंत तीन ते चार वेळेस अत्याचार केल्याचेही पीडितेने सांगितले, सरकारी रुग्णालय घाटीमध्ये तपासणी केल्यानंतर अत्याचार केल्याचे स्पष्ट झाले होते. त्यानंतर पीडितेच्या आईच्या तक्रारीवरून एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. त्यामध्ये आता जिल्हा व सत्र न्यायालयाने त्या नराधम बापाला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com