नागपूरमध्ये विवाहित महिलेची आत्महत्या
पतीसोबतच्या वादामुळे मानसिक तणाव वाढला होता
सुसाईड नोटमध्ये पतीवर प्रेम व्यक्त
पोलिसांकडून प्रकरणाचा सखोल तपास सुरू
पराग ढोबळे, नागपूर
पुण्यातील वैष्णवी हगवणे प्रकरण ताजे असताना आता नागपूरमधून धक्कादायक बातमी समोर आली आहे. नागपूरच्या महादुला कोराडी परिसरात मानसिक तणावातून एका विवाहित महिलेने आपले जीवन संपवले. पतीसोबत होणाऱ्या सततच्या वादातून तिने हे पाऊल उचलले असल्याचे म्हटले जात आहे. दरम्यान महिलेने आत्महत्येपूर्वी सुसाईड नोट लिहिली आहे. या चिठ्ठीत नवऱ्याबद्दल मृत महिलेने प्रेम व्यक्त केले आहे. महिलेच्या आत्महत्येनंतर तिच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून पोलीस या घटनेचा सखोल तपास करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, मयुरी मेंढे अस मृतक विवाहितेच नाव आहे. मयुरी आणि तिच्या पतीमध्ये वारंवार भांडण व्हायची या भांडणातून मयुरी त्रस्त झाली होती. महिनाभरापूर्वी ती माहेरी निघून गेली. काही दिवसांपूर्वी तिने पतीशी संवाद साधायचा, त्याला कॉल करण्याचा प्रयत्न केला, पण समोरून कोणीही फोन न उचलल्याने मयुरी हताश झाली.
या नैराश्येतून तिने टोकाचा निर्णय घेतला. घरातील मंडळी बाहेर गेले असल्याचे पाहून गळफास घेत मयुरीने आत्महत्या केली. रात्री मयुरीचे कुटुंबीय घरी परतल्यावर घरातून कोणीही उत्तर देत नसल्याने तसेच खोलीचा दरवाजा बंद असल्याने घाबरले. त्यांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला. यावेळेस मयुरी गळफास घेतलेल्या अवस्थेत सापडली.
कुटुंबीयांनी तिला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल केले, मात्र तो पर्यंत उशीर झाला होता. डॉक्टरांनी मयुरीला उपचारापूर्वी मृत घोषित केले. याप्रकरणी संतप्त झालेल्या महिलेच्या पालकांनी पोलीस ठाण्यात धाव घेत तिच्या पती विरोधात मानसिक छळ केल्याची तक्रार दाखल केली. पोलीस तपासात मयुरीने आत्महत्येपूर्वी लिहिलेली सुसाईड नोट सापडली. या चिठ्ठीत मृत महिलेने तिच्या पतीवर असलेल्या प्रेमाची कबुली दिली. दरम्यान आता महिलेच्या भावाच्या तक्रारीवरून पोलीस पुढील तपास करत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.