Nagpur Accident: उपचार घेऊन घरी परतत होते... वाटेतच काळाने गाठलं; पत्नीसमोरच 74 वर्षीय पतीचा हिट अँड रनमध्ये मृत्यू

Nagpur Road Accident : नागपूरच्या धरमपेठ येथील अलंकार टॉकीज परिसरात भरधाव डस्टर कारने दुचाकीला धडक दिली. या अपघातात 74 वर्षीय रामदास पाटील यांचा मृत्यू झाला असून त्यांची पत्नी जखमी झाली आहे. फरार कारचालकाचा पोलीस शोध घेत आहेत.
Nagpur Hit-and-Run Horror  Speeding Duster Car
Nagpur Road Accident Newssaam tv
Published On
Summary
  • नागपूरच्या धरमपेठ परिसरात हिट अँड रनची धक्कादायक घटना घडली.

  • अलंकार टॉकीजजवळ भरधाव डस्टर कारने दुचाकीला धडक दिली.

  • हॉस्पिटलमधून उपचार घेऊन दाम्पत्य अजनीतील घरी परतत होते.

पराग ढोबळे, साम प्रतिनिधी

नागपूरच्या धरमपेठ परिसरात हिट अँड रनची धक्कादायक घटना घडलीय. हॉस्पिटलमधून उपचार घेऊन घरी परतणाऱ्या दम्पत्याला एका भरधाव कारनं उडवलं. या दुर्घटनेत एका ७४ वर्षी व्यक्तीचा मृत्यू झाला. हा अपघात नागपूर शहरातील धरमपेठ भागातील अलंकार टॉकीज परिसरात घडली. रामदास पाटील, असं अपघातात मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीचे नाव आहे.

रामदास पाटील हे आपल्या पत्नीसह व्होकार्ट हॉस्पिटलमध्ये उपचार घेऊन अजनी परिसरातील आपल्या घरी जात होते. नागपूर सुधार प्रन्यासच्या सभापतींच्या बंगल्यासमोर त्यांची दुचाकी आली असताना तेथे एका डस्टर कारनं त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. कारची धडक होताच नंतर कारचालक अधिक वेगाने कार तेथून पळवत पसार झाला.

Nagpur Hit-and-Run Horror  Speeding Duster Car
आईच्या नावाची जमीन विकली अन् संताप अनावर; दोन मुलांनी भररस्त्यात आई-वडिलांना मारलं!

या दुर्घटनेत रामदास पाटील यांचा जागीच मृत्यू झाला. तर पत्नी जखमी झालीय. संध्याकाळच्यावेळी दुर्घटना घडल्यानं अलंकार टॉकीज परिसरात मोठी वाहतूक कोंडी झाली होती. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून वाहतूक सुरळीत करण्यास सुरुवात केली. दरम्यान पोलिसांकडून फरार कारचालकाचा शोध घेतला जातोय.

Nagpur Hit-and-Run Horror  Speeding Duster Car
Government Hospital: रुग्णाच्या अंगावरच कोसळला स्लॅब; अलिबाग जिल्हा रुग्णालयाच्या दुरावस्थेचा धक्कादायक प्रकार

भरधाव कारने मुलाला चिरडलं; 9 वर्षाच्या चिमुरड्याचा जागीच मृत्यू

मुंबईतील वांद्र्यात एका भरधाव कारनं नऊ वर्षाच्या मुलाला चिरडल्याची घटना दोन -तीन दिवसापूर्वी घडली होती. मेहेबूब स्टुडिओच्या परिसरात हा अपघाताचा थरार घडला होता. एक महिला कार चालवत होती. कार चालवताना ही महिला मोबाईल फोनवर बोलत होती. त्याचवेळी रस्त्याच्या कडेला असलेल्या एक मुलाला कारनं उडवलं. तेथील स्थानिकांनी मुलाला रुग्णालयात दाखल केलं, परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

अनियंत्रित कार ट्रॅफिक पोलिसांच्या चौकीत घुसली

नवी मुंबईतील बेलापूर परिसरात एक अनियंत्रित कार रस्त्यावरील लोखंडी रेलिंग तोडून थेट ट्रॅफिक पोलिसांच्या चौकीच्या आवारात घुसल्याची घटना काही दिवसापूर्वी घडली होती. कारने चौकीजवळील एका खोलीच्या भिंतीला जोरदार धडक दिल्याने भिंत तुटली. या अपघातात कारचेही नुकसान झाले. माहितीनुसार, किया सोनेट कार क्रमांक एमएच ४६ बीव्ही २१५२ चा चालक कार भरधाव व निष्काळजीपणे चालवत होता. त्यामुळे कारवरील नियंत्रण सुटून हा अपघात झाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com