Nagpur Crime : डुप्लिकेट चाबीचा वापर करत दुचाकी चोरी; १५ दुचाकीसह चोरटा ताब्यात

Nagpur News : नागपूरच्या पोलीस कोतवाली ठाण्याच्या हद्दीत गस्त सुरू असताना गुप्त बातमीदाराने संशयित आरोपी शिवम नाकाडे याने दुचाकी चोरी केल्याची माहिती दिली. तर शिवम हा चोरीची दुचाकी वापरत होता
Nagpur Crime
Nagpur CrimeSaam tv
Published On

पराग ढोबळे 
नागपूर
: मागील काही दिवसांपासून नागपूर शहर व परिसरातून दुचाकी चोरीच्या घटना वाढल्या होत्या. या प्रकरणी पोलिसात दाखल तक्रारीवरून पोलिसांनी शोध घेतला असता एका जणाला १५ दुचाकींसह ताब्यात घेण्यात आले आहे. त्याने दुचाकी चोरीची कबुली दिली असून बनावट चाबीचा वापर करून दुचाकी चोरी करत असल्याचे समोर आले आहे. दरम्यान त्याचा साथीदार मात्र फरार आहे. 

नागपुरात मागील काही दिवसांपासून दुचाकी चोरीच्या घटना वाढल्या होत्या. त्यानुसार नागपूरच्या पोलीस कोतवाली ठाण्याच्या हद्दीत गस्त सुरू असताना गुप्त बातमीदाराने संशयित आरोपी शिवम नाकाडे याने विविध भागात दुचाकी चोरी केल्याची माहिती दिली. एवढेच नाही तर शिवम हा चोरीची दुचाकी वापरत होता. त्याच्या घरासमोर उभ्या असलेल्या दुचाकीबाबत विचारणा केली असता शिवम हा स्वतःचीच असल्याची बतावणी केली.

Nagpur Crime
Pimpri Chinchwad Police : रेव्ह पार्टी करणाऱ्या बारवर पोलिसांची धाड; व्हॅलेंटाईनच्या मध्यरात्री पिंपरी चिंचवडमध्ये कारवाई

दुचाकी नंबर वेगळे आढळले 
मात्र पोलिसांनी गाडीची शहानिशा केली. तेव्हा दुचाकीचा क्रमांक आणि चेसीस क्रमांक वेगळा असल्याचे लक्षात आले. यावरून संशयित आरोपी शिवम याची पोलिसांनी चौकशी सुरू केली. यात शिवमने आपला साथीदार विसबा याच्या सोबत वाहन चोरी केल्याची कबुली दिली. दरम्यान शिवम पोलिसांच्या ताब्यात सापडला असून त्याचा साथीदार विसबा हा मात्र फरार आहे. त्याचा शोध पोलिसांकडून सुरु आहे. 

Nagpur Crime
Climate Change : तापमान वाढीचा फळबागांना फटका; कांद्याच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता

७ लाख ८० हजाराचा मुद्देमाल जप्त 

डुप्लिकेट चाबीने दुचाकीचे लॉक उघडून दुचाकी चोरी करणाऱ्या संशयित आरोपी शिवम याने नागपूर शहरातील वेगवेगळ्या पोलीस स्टेशन हद्दीतून १५ दुचाकी चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. यातील काही वाहने ओळखीच्या व्यक्तींना विकलेली होती. कोतवाली पोलिसांनी शिवमकडून १५ दुचाकीसह एकूण ७ लाख ८० हजार ररुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com