Crime News: आईसोबत प्रेमसंबंध असल्‍याची कुणकुण; मुलाने केली हत्‍या

आईसोबत प्रेमसंबंध असल्‍याची कुणकुण; मुलाने केली हत्‍या
Crime News
Crime NewsSaam tv
Published On: 

नागपूर : नागपुरातील शांतीनगर पोलीस स्टेशन हद्दीत रात्री सुदर्शन कावंडे यांचा मृतदेह आढळला होता. या हत्येचा (Crime News) उलगडा झाला आहे. प्रेमसंबंध असलेल्‍या महिलेच्‍या मुलाने हत्‍या केल्‍याचे समोर आले आहे. (Maharashtra News)

Crime News
Bribe Trap: लाचखोर पोलीस उपनिरीक्षकास बेड्या; पत्‍नीला आरोपी न बनिवण्यासाठी घेतले दोन लाख

हत्येचा तपास करीत असताना (Police) पोलिसांना माहिती मिळाली, की आरोपी शुभम देशपांडे याच्‍या आईचे सुदर्शन सोबत प्रेमसंबंध होते. ही गोष्ट शुभमला माहिती पडली. त्यानंतर शुभमने आपला मित्र सचिन याला सांगितले. दोघांनी मिळून सुदर्शनला (Nagpur News) संपविण्याचा कट रचला आणि मंगळवारी रात्री सुदर्शन कावंडे याच्यावर चाकूने वार करून त्याची हत्या केली.

दोन्‍ही आरोपींना अटक

शांतीनगर पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला असून, या प्रकरणी तपास सुरू केला. तपासादरम्‍यान संशयीत आरोपी शुभम आणि सचिन या दोन्हींना अटक करून पोलिस पुढील तपास करीत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com