Nagpur Crime : दुकानाच्या शटर दुरुस्तीला आला, २ तासात १७ अल्पवयीन विद्यार्थिनींचा विनयभंग; महाराष्ट्र हादरला

Nagpur 17 Minor Gir Students Molested : केवळ २ तासात आरोपी याने स्टेशनरी दुकानात सामान घेण्यासाठी आलेल्या सुमारे १७ चिमुकल्या मुलींशी अश्लील कृत्य करुन विनयभंग केला.
Nandanav 17 minor girls molested
Nandanav 17 minor girls molestedSaamTV
Published On

नागपूर : राज्यात महिलांवर आणि अल्पवयीन मुलींवर अत्याचार करण्याच्या घटनांमध्ये वाढ झालेली आहे. कठोर कारवाई करुन देखील काही नरधमांना पोलिसांचा धाकच उरलेला दिसत नाहीय. नागपूरमध्ये अशीच एक संतापजनक घटना उघडकीस आली आहे. येथे एक-दोन नव्हे तर १७ अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याची घटना उघडकीस आली. पोलिसांनी या नरधमाला अटक केली आहे.

नागपूरच्या नंदनवन पोलिस ठाण्याअंतर्गत एका विकृत मानसिकतेच्या व्यक्तीने एका खासगी शाळेतील अल्पवयीन विद्यार्थिंनीचा विनयभंग केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणी तक्रार आल्यानंतर पालकांमध्येही भीतीचे वातावरण निर्माण झालं आहे.

Nandanav 17 minor girls molested
Strawberry: भीमाशंकरची स्ट्रॉबेरी पोहचली सातासमुद्रापार! दुबईत भाव खातेय

शहरातील नंदनवन पोलीस ठाण्याच्या परिसरात ही खासगी नामांकित शाळा आहे. शाळेजवळ स्टेशनरीचे दुकान आहे. बुधवारी दुपारी एक चिमुरडी शाळकरी मुलगी स्टेशनरी दुकानात सामान घेण्यासाठी गेली असता हा प्रकार घडला. रवी लाखे (वय ३६) असं आरोपीचं नाव आहे. आरोपी रवी हा शटर दुरुस्ती करण्याचं काम करतो. स्टेशनरी दुकानात लावलेलं शटर खराब झाल्याने रवी दुकानात आला होता. केवळ २ तासात आरोपी याने स्टेशनरी दुकानात सामान घेण्यासाठी आलेल्या सुमारे १७ चिमुकल्या मुलींशी अश्लील कृत्य करुन विनयभंग केला. मात्र, भीती आणि अज्ञानामुळे आरोपीते हे घृणास्पद कृत्य त्या चिमुरडीला समजू शकले नाही, त्यामुळे त्यांनी प्रतिकार देखील केला नाही.

शाळा सुटल्यानंतर काही मुलींनी घरी जाऊन घरच्यांना घडलेली सर्व हकीकत सांगितली. यानंतर संतप्त कुटुंबीयांनी प्रथम शाळा गाठली आणि शाळा प्रशासनाला या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी नंदनवन पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार केली. मात्र, सुरुवातीला कुटुंबातील काही सदस्यच तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात पोहोचले. मात्र, आरोपी रवी विरुद्ध पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्याची माहिती मिळताच इतर लहान मुलांनीही हा प्रकार कुटुंबीयांना सांगितला.

Nandanav 17 minor girls molested
Maharashtra Politics : पंकजा मुंडे नवा पक्ष काढणार? छगन भुजबळ म्हणाले काही हरकत नाही

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com