Strawberry: भीमाशंकरची स्ट्रॉबेरी पोहचली सातासमुद्रापार! दुबईत भाव खातेय

Bhimashankar Strawberry Farming: भीमाशंकरची स्ट्रॉबेरी आता सातासमुद्रापार पोहचली आहे. महाराष्ट्राच्या स्ट्रॉबेरीची मागणी दुबईत वाढताना दिसत आहे.
Strawberry
StrawberrySaam Tv
Published On

भिमाशंकरच्या डोंगरमाळरानावरच्या स्ट्रॉबेरी थेट दुबई दरबारी पोहचलीये. दुबईकर ही भिमाशंकरच्या या लालचुटुक स्ट्रॉबेरीच्या प्रेमात पडलेत. दुबईकरांनी भिमाशंकरच्या अर्धा किलो स्ट्रॉबेरीला सहाशे रुपये मोजल्याचा दावा केला जातोय. भिमाशंकरच्या आदिवासी पट्ट्यातील डोंगराळ भागातील 55 शेतकऱ्यांनी एकत्र येत स्टॉबेरीची ग्रुप शेती केलीये. कृषी विभागाने शेतकऱ्यांना प्रशिक्षण देत, स्ट्रॉबेरी शेतीसाठी अनुदानही दिलंय.

शेतकऱ्यांनी ही स्ट्रॉबेरी शेती करायचं ठरवलं अन् आदिवासी पट्ट्यात स्ट्रॉबेरी फुलवली. शेतकऱ्यांनी गाळलेल्या घामाचा आता गोडवा चाखायला मिळतोय. भारतात तर ही स्ट्रॉबेरी पसंतीला येतेयचं पण अगदी दुबई दरबारी सुद्धा ही स्ट्रॉबेरी पोहचलीये. भिमाशंकरच्या या स्ट्रॉबेरीची भुरळ दुबईकरांना पडलीये. दुबईच्या शेख कंपनीने भिमाशंकरला स्ट्रॉबेरी शेतीला भेट देण्याचं ही ठरवलंय.

Strawberry
Success Story: अभ्यासासाठी २ वर्षाच्या मुलाला लांब ठेवलं, दुसऱ्याच प्रयत्नात UPSC क्रॅक; IAS अनु कुमारी यांचा प्रेरणादायी प्रवास

आंबेगाव तालुक्यातील पश्चिम पट्ट्यात नव्यानेच स्ट्रॉबेरीचे क्लस्टर तयार होत असून यंदा ही स्ट्रॉबेरी परदेशात निर्यात करण्यात आली आहे. दोन टप्प्यात दुबईला ही स्ट्रॉबेरी निर्यात केली असून तेथील ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे.

मागच्या दोन ते तीन वर्षांपासून आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम भागामध्ये आदिवासी शेतकरी प्रायोगिक तत्वावर स्ट्रॉबेरीची लागवड करत आहेत. आदिवासी विभागाच्या न्युक्लिअस बजेट योजनेंतर्गत या शेतकऱ्यांना स्ट्रॉबेरी लागवडीसाठी अनुदान मिळत असून यातून आत्तापर्यंत ५५ शेतकऱ्यांनी लाभ घेतला आहे. त्यामुळे यावर्षी स्ट्रॉबेरीचे क्षेत्र ३० गुंठ्यांवरून ३०० गुंठे म्हणजे ३ हेक्टरपर्यंत पोहोचले आहे. येथील शेतकऱ्यांना या स्ट्रॉबेरीचे 'भिमाशंकर स्ट्रॉबेरी' असं नामकरण केलं आहे.

या शेतक-यांनी रासायनिक खतांचा वापर कमी प्रमाणात करत असल्याने ही स्ट्रॉबेरी खाण्यासाठी अत्यंत गोड आणि मधाळ आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर ग्राहकांच्या प्रतिक्रियेसाठी दोन टप्प्यामध्ये दुबईला स्ट्रॉबेरी निर्यात करण्यात आली. निर्यात करण्यात आलेल्या स्ट्रॉबेरीला विक्रमी दर मिळाला आहे.

Strawberry
Success Story: लहानपणीच वडिलांचे छत्र हरपले, लेकीने जिद्दीने एकदा नव्हे तर दोनदा क्रॅक केली UPSC; IAS दिव्या तंवर यांचा प्रेरणादायी प्रवास

अर्ध्या किलोच्या एका पॅकिंगसाठी ६०० रूपयांचा दर मिळत आहे. पहिल्यांदाच आदिवासी शेतकऱ्यांची स्ट्रॉबेरी दुबईला पोहचल्यामुळे येथील शेतकऱ्यांना प्रोत्साहन मिळणार असून येणाऱ्या काळात स्ट्रॉबेरीचे क्षेत्र वाढण्यास मदत होणार आहे.

महाबळेश्वर येथे स्ट्रॉबेरीचे क्लस्टर तयार होण्यासाठी सुरूवातीला आयसीआयसीआय फाऊंडेशनने शेतकऱ्यांना रोपे देऊन लागवडीसाठी प्रोत्साहन दिले होते. त्यानंतर न्युक्लिअस बजेट अंतर्गत शेतकऱ्यांना जवळपास ९० टक्क्यापर्यंत अनुदान जाहीर करण्यात आले.

Strawberry
Success Story: डॉक्टर बनली, UPSC परीक्षेत मिळवलं यश; साडेसात वर्षे IAS पदी काम केल्यानंतर सोडली नोकरी; डॉ. तनू जैन यांचा प्रवास वाचा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com