Nagpur News
Nagpur NewsSaam Tv

Accident: नागपुरात भीषण अपघात; दुचाकीस्वार उड्डाण पुलावरून खाली फेकल्या गेले

अपघातात दोघांचा जागीच मृत्यु, दोन गंभीर जखमी
Published on

Nagpur Accident News: नागपूरच्या (Nagpur) सक्करदरा परिसरात भीषण अपघात घडला आहे. कार चालकाने तीन दुचाकी स्वरांना मागून जोरदार धडक दिल्यामुळे दुचाकीवरील लोक पुलावरून खाली फेकले गेले आणि त्यांचा मृत्यू झाला. या अपघातात दोघांचा जागीच मृत्यु झाला असून दोन जण गंभीर जखमी आहे.

हे देखील पाहा -

जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहे. कारचालक दारू पिऊन कार चालवत असल्याची माहिती समोर आली आहे. करवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे.

Nagpur News
पुणे हादरलं! फार्म हाऊसवर नातेवाईकाने केला अल्पवयीन मुलीवर बलात्कार

अपघात नेमका कसा झाला?

हा भीषण अपघात रात्री सव्वा दहा वाजेच्या सुमारास सक्करदरा फ्लायओवरवर झाला. अनियंत्रित चारचाकी कारने दोन दुचाकींना जोरदार धडक दिल्यामुळे दुचाकीवरील चौघे जण पुलावरून खाली फेकले गेले. दुचाकीवरील चौघे सुमारे 70 ते 80 फूट उंचीवरून खालच्या रस्त्यावर फेकले गेल्याने दोघांचा जागीच मृत्यु झाला असून दोन जण गंभीर जखमी आहे. त्यांना शासकीय वैद्यकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी धडक देणाऱ्या चार चाकी वाहनाच्या चालकाला ताब्यात घेतले असून तो ड्रायव्हर असल्याची माहिती समोर आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com