- सुशील थोरात
Shevgaon News : शेवगाव शहरातील वादग्रस्त घटनेनंतर सलग चाैथ्या दिवशी (बुधवार, ता. 17 मे) गावातील व्यावसायिकांनी त्यांची दुकानं तसेच ग्रामस्थांनी गाव बंद (shevgaon Bandh) ठेवले आहे. दरम्यान शेवगाव येथील घटनेच्या निषेधार्थ पाथर्डी तालुक्यातील करंजी ग्रामस्थांनी देखील गाव बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. (Maharashtra News)
शेवगाव शहरातील वादग्रस्त घटनेनंतर पाेलिसांनी 31 जणांना ताब्यात घेतले. न्यायालयाने त्यांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. दरम्यान या घटनेनंतर जाेपर्यंत ढासळलेली कायदा व सुव्यवस्था सुरळीत हाेत नाही ताेपर्यंत गावातील व्यापारी संघटनांनी आणि ग्रामस्थांनी गाव बेमुदत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यानूसार आजही गावातील दुकानं बंद ठेवण्यात आली आहेत.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.