Naam Foundation: महाबळेश्वरातील शेतक-यांसाठी 66 जेसीबी, 6 पोकलेन, 4 डंपर, 3 ट्रॅक्टर दाखल

ही संपुर्ण यंत्रणा गावा गावात जाऊन नुकसान झालेल्या शेतीची पुनर्बांधणीचे काम करणार आहे.
naam foundation
naam foundationsaam tv
Published On

सातारा : जुलै महिन्यात झालेल्या मुसळधार पाऊसाने सातारा जिल्ह्यातील असंख्य गावांना मोठा फटका बसला. यामध्ये तब्बल 1580 हेक्टर शेतजमिनीचे नुकसान झाले. शासनाच्या तोडक्या यंत्रणेमुळे आजही असंख्य गावांना मदत मिळाली नाही. परंतु सातारा जिल्हाधिकारी शेखर सिंह (shekhar sinh) आणि नाम फाऊंडेशनच्या (naam foundation) यांच्या सहकार्याने महाबळेश्वर (mahableshwar) तालूक्यातील बाधित गावांना मोठा दिलासा मिळाला आहे.

या लोकांचे झालेले नुकसान पाहता त्यांना हातभार लावण्यासाठी तब्बल 66 जेसीबी, 6 पोकलेन, चार डंपर आणि तीन ट्रॅक्टर असे उपलब्ध करुन देण्यात आले आहे. आता ही संपूर्ण यंत्रणा महाबळेश्वरात पोहचली आहे. ही संपुर्ण यंत्रणा गावा गावात जाऊन नुकसान झालेल्या शेतीची पुनर्बांधणीचे काम सुरु करणार आहेत.

naam foundation
Agriculture Budget 2022: शेतकऱ्यांसाठी सरकारची मोठी घोषणा; सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन

ही मोहिम सुमारे 15 दिवस सुरु राहणार असून या यंत्रणेसाठी डीपीडीसीमधून डिझेलची सोय करण्यात आली आहे. साधारण जुन जुलै महिन्यात या भागात भात लागवडीसाठी लगबग सुरु होते आणि या शेतकऱ्यांना स्वत:च्या शेतात भात शेती करता यावी या करीता त्यांना शेत तयार करुन देण्याचा प्रयत्न सुरु करण्यात आला आहे अशी माहिती राजेंद्रकुमार जाधव (प्रांताधिकारी, वाई) यांनी दिली.

Edited By : Siddharth Latkar

naam foundation
Pune: प्रवाशांनाे! फ्लॅट फाॅर्म तिकीट झाले 40 रुपयांनी कमी; आता भरा फक्त दहा रुपये
naam foundation
Sindhudurg: पीए राकेश परबची पाेलिस काेठडीत रवानगी; नितेश राणेंच्या जामीन अर्जावर आज निकाल

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com