Chicken- Mutton Prices: श्रावण संपताच चिकन-मटणाच्या दुकानांवर नागरिकांची गर्दी; नॉनव्हेजचे दरही वाढले, पाहा...

Chicken- Mutton Price Increased: श्रावण महिना संपल्याने पोळ्याचा पाडवा मांसाहार प्रेमींसाठी पर्वणी असतो. शहरातील विविध मटण मार्केटमध्ये मटण, चिकन खरेदीसाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे.
Chicken- Mutton Prices: श्रावण संपताच चिकन-मटणाच्या दुकानांवर नागरिकांची गर्दी; नॉनव्हेजचे दरही सुसाट वाढले, पाहा...
Chicken- Mutton PricesSaam Tv
Published On

Chicken- Mutton Price after Shravan: श्रावण महिना संपाताच चिकन, मटण आणि माश्यांच्या दरामध्ये वाढ झाली आहे. श्रावण महिन्यामध्ये अनेक जण मासांहार खात नाही. त्यामुळे चिकन, मटण आणि माश्यांचे दर कमी झाले होते. पण आता श्रावण महिना संपला त्यानंतर आता खवय्यांनी मटन, चिकनच्या दुकानावर मोठी गर्दी केली आहे. चिकन, मटणच्या दरामध्ये किती रुपयांनी वाढ झाली हे आपण पाहणार आहोत....

Chicken- Mutton Prices: श्रावण संपताच चिकन-मटणाच्या दुकानांवर नागरिकांची गर्दी; नॉनव्हेजचे दरही सुसाट वाढले, पाहा...
Chicken Tikka Recipe Inventor Death : चिकन टिक्का मसाला रेसिपी बनवणारे शेफ अली अहमद याचे निधन

मिळालेल्या माहितीनुसार, पोळ्याच्या पाडव्याच्या निमित्याने आज नागपूरात लाखो रुपयांची मटण, चिकनची विक्री होणार आहे. श्रावण महिना संपल्याने पोळ्याचा पाडवा मांसाहार प्रेमींसाठी पर्वणी असतो. शहरातील विविध मटण मार्केटमध्ये मटण, चिकन खरेदीसाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे. मटण-चिकनच्या शॉपबाहेर नागरिकांनी रांगा लावल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. पाडव्याच्या निमित्ताने हैद्राबाद, मध्यप्रदेशातून बोकड आणि कोंबड्यांची मोठ्या प्रमाणात आवक होत आहे.

Chicken- Mutton Prices: श्रावण संपताच चिकन-मटणाच्या दुकानांवर नागरिकांची गर्दी; नॉनव्हेजचे दरही सुसाट वाढले, पाहा...
Bugs found in Chicken Biryani : किळसवाणा प्रकार! चिकण बिर्याणीत आढळल्या अळ्या, ग्राहकांच्या जीवाशी खेळ सुरुच

मटण, चिकन विक्रीने आज नागपूरच्या बाजारात मोठी उलाढाल होणार आहे. आज मटण 750 रुपये प्रती किलो दराने विकले जात आहे. गावरण कोंबडी 700 रुपये प्रति किलो तर बॉयलर, कोक्रेल कोंबडी 220 रुपये प्रति किलो दराने विकली जात आहे. श्रावण संपल्यानंतर आता मटण, चिकनच्या मागणीमध्ये वाढ झाल्यामुळे दरामध्ये वाढ झाली आहे.

नागपूरातील दर -

- गावरण कोंबडी - ७०० रुपये किलो

- बॉयलर कोंबडी - २२० रुपये किलो

- मटण - ७५० रुपये किलो

मुंबईतील दर -

- जिवंत कोंबडी - 178 रुपये किलो

- चिकन - 200 रुपये किलो

- मटण - 780 रुपये किलो

Chicken- Mutton Prices: श्रावण संपताच चिकन-मटणाच्या दुकानांवर नागरिकांची गर्दी; नॉनव्हेजचे दरही सुसाट वाढले, पाहा...
Kolhapur Rally: लग्नासाठी पोरगी, स्वस्त मटन अन् समुद्र मिळालाच पाहिजे; कोल्हापुरकरांची अतरंगी मागण्यांसाठी रॅली

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com