मुस्लीम चिडला, जलीलांवर हल्ला; छत्रपती संभाजीनगरमध्ये नेमका राडा कशामुळे झाला?

chhatrapati sambhaji nagar : छत्रपती संभाजीनगरात एमआयएममध्ये मोठा राडा झालाय. मुस्लीम कार्यकर्त्यांनीच एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील यांच्यावर हल्ला केलाय. नेमका हा राडा कशामुळे झाला? जलील यांच्यावर मुस्लीम का चिडले आहेत? यावरचा हा विशेष रिपोर्ट..
chhatrapati sambhaji nagar news
chhatrapati sambhaji nagarSaam tv
Published On

ही दृश्य बिहारमधील नाहीत तर ही दृश्ये आहेत छत्रपती संभाजीनगरमधील....एमआयएमची मूळ व्होट बँक असलेल्या मुस्लीम समाजातील नागरिकांनी थेट एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांच्या गाडीवर हल्ला चढवला..... एवढंच नाही तर जलीलांना मारहाण कऱण्याचाही प्रयत्न झाल्यानं छत्रपती संभाजीनगरमध्ये राडा झालाय...

मात्र या संघर्षाची ठिणगी पडली ती माजी खासदार जलील यांच्या पदयात्रेवेळी...इम्तियाज जलील यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये एमआयएमच्या उमेदवारांसाठी पदयात्रा काढली... याच पदयात्रेला एमआयएमच्या नाराज गटानं काळे झेंडे दाखवले....

chhatrapati sambhaji nagar news
भाजपच्या केंद्रीय मंत्र्यांचं वादग्रस्त विधान; छत्रपती शिवरायांना गुजरातला पळवण्याचा डाव, VIDEO

यानंतर जलील यांना अडवण्याचा प्रयत्न झाला.. दोन्ही गट आमने-सामने आल्यानंतर तिथंच वादाची ठिणगी पडली... आणि जलील यांच्यासमोरच हमरीतुमरीचं रुपांतर राड्यात झालं... यानंतर उमेदवारी न मिळालेल्या गटाच्या नाराज कार्यकर्त्यांनी थेट जलील यांच्या गाडीवर हल्ला केला... एवढंच नाही तर जलील यांचे कार्यकर्ते महिलांविषयी अश्लील वक्तव्य करत असल्यानंच हा हल्ला झाल्याचं स्थानिकांनी म्हटलंय...

दुसरीकडे इम्तियाज जलील यांनी या हल्ल्याबाबत भाजपचे पशुसंवर्धन मंत्री अतुल सावे आणि शिंदे सेनेचे मंत्री संजय शिरसाट यांच्यावर आरोप केलेत... तर शिरसाटांनी हे आरोप फेटाळून लावलेत..

chhatrapati sambhaji nagar news
Pune Shocking : पुण्यात खळबळ; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने लॉजमध्ये केली आत्महत्या

खरंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये जलील यांनी एमआयएमच्या 22 विद्यमान नगरसेवकांचं तिकीट कापलं... त्यानंतर मुस्लीम समाजाचे नाराज कार्यकर्ते काँग्रेसमध्ये गेले... तिथूनच हा संघर्ष पेटल्याचं म्हटलं जातंय. मात्र एमआयएममधील या नाराजीचा परीणाम निश्चितच मतांवर होणार आहे. मतविभागणी होऊन शिवसेनेला फायदा होण्याची शक्यता आहे. ज्या मुस्लीम समाजाने जलील यांना डोक्यावर घेतलं... तोच मुस्लीम समाज जलील यांच्या गाडीवर हल्ला करतोय... मात्र पुरोगामी महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे काढत नेत्यांवर हल्ले व्हायला लागले तर ही चिंतेची बाब आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com