Murbad Crime: अभ्यास घेण्याच्या बहाण्याने घरी बोलावलं, माजी उपसरपंचाने अल्पवयीन मुलीसोबत केलं भयंकर कृत्य

Deputy Sarpanch Physically Abused Of 10th Student: मुरबाडमध्ये माजी उपसरपंचाने ओळखीमध्ये असलेल्या १५ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला. या घटनेमुळे खळबळ उडालीये.
Murbad Crime: अभ्यास घेण्याच्या बहाण्याने घरी बोलावलं, माजी उपसरपंचाने अल्पवयीन मुलीसोबत केलं भयंकर कृत्य
Murbad Police Station Saam Tv
Published On

मयुरेश कडव, मुरबाड

मुरबाडमध्ये माजी उपसरपंचाने अल्पवयीन मलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मुरबाडच्या नारिवली गावामध्ये ही घटना घडली आहे. पीडित मुलीने विषारी औषध पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या घटनेप्रकरणी माजी सरपंचाविरोधात मुरबार पोलिस ठाण्यामध्ये पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुरबाडमध्ये माजी उपसरपंचाने ओळखीमध्ये असलेल्या १५ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला. पीडित मुलगी दहावीमध्ये शिकते. मुरबाडच्या नारिवली गावामध्ये दोघेही राहायला आहेत. माजी उपसरपंचाने त्याच परिसरात राहणाऱ्या दहावीत शिकणाऱ्या मुलीवर बलात्कार केला.

Murbad Crime: अभ्यास घेण्याच्या बहाण्याने घरी बोलावलं, माजी उपसरपंचाने अल्पवयीन मुलीसोबत केलं भयंकर कृत्य
Pune Crime: कॉलेजला जायला घराबाहेर पडला, परत आलाच नाही; तरुणासोबत घडलं भयंकर

अभ्यासाचं मार्गदर्शन करण्याच्या बहाण्याने पीडित मुलाला घरी बोलावून आधी तिचा विनयभंग केला. त्यानंतर तिला गावातल्या एका पडीक घरात नेऊन तिच्यावर बलात्कार केला. या प्रकारानंतर पीडित मुलीने कीटकनाशक पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. मुलीच्या कुटुंबीयांनी तिला विश्वासात घेऊन विचारणा केली असता तिने दयानंद भोईर याने आपल्यावर बलात्कार केल्याची माहिती दिली.

Murbad Crime: अभ्यास घेण्याच्या बहाण्याने घरी बोलावलं, माजी उपसरपंचाने अल्पवयीन मुलीसोबत केलं भयंकर कृत्य
Latur Crime: धक्कादायक! जिल्हा परिषद शाळेतील १६ विद्यार्थिनींचा विनयभंग, शिक्षकाविरोधात गुन्हा

मुलीवर बलात्कार झाल्याचे ऐकून पीडितेच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला. पीडित मुलीच्या कुटुंबीयांच्या तक्रारीवरून मुरबाड पोलिस ठाण्यात दयानंद भोईरच्याविरोधात पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस पोलिस पुढील तपास करत आहेत. या घटनेमुळे मुरबाडमध्ये खळबळ उडाली आहे.

Murbad Crime: अभ्यास घेण्याच्या बहाण्याने घरी बोलावलं, माजी उपसरपंचाने अल्पवयीन मुलीसोबत केलं भयंकर कृत्य
Mumbai Crime: मुंबई हादरली! १३ वर्षांच्या मुलीवर आजोबांकडून लैंगिक अत्याचार

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com